या आधी सुश्मिता सेन 9 वेळा प्रेमात पडली होती, ल...

या आधी सुश्मिता सेन 9 वेळा प्रेमात पडली होती, ललित मोदी आहे तिचा 10 वा प्रियकर (Sushmita Sen`s LOVE life: Sushmita Sen dated 9 Men Before Being Lalit Modi’s ‘Better Half’, He is The 10th Man She Found Love In)

आयपीएलचे माजी चेअरमन आणि बिझनेसमन ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे खासगी फोटो शेअर करून त्यांचे प्रेम उघडपणे व्यक्त करत सिनेइंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सुष्मिता पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. कालपासून तर ती सोशल मीडियावर ट्रेंडींग विषय बनली आहे. अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाला होता. त्यामुळे सुष्मिताचे मन भारतातून फरार झालेल्या ललित मोदीवर एवढ्या लवकर कसे काय जडले हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आज आपण सुष्मिता सेनचे अफेअर, ब्रेकअप आणि तिच्या आतापर्यंतच्या प्रेमजीवनाबद्दल जाणून घेणार आहोत.

46 वर्षीय सुष्मिताचे आतापर्यंत 9 लोकांसोबत अफेअर होते. आता ललित मोदी तिच्या आयुष्यात येणारे 10 वे व्यक्ती आहेत. पण 9 जणांसोबत अफेअर केलेल्या सुष्मिताने अजूनही लग्न केलेले नाही, पण तिचा सध्याचा बॉयफ्रेंड ललित मोदी यांनी ते दोघेही लवकरच लग्न करू शकतात असे संकेत दिले आहेत.

रोहमन शॉल

सुष्मिता काही महिन्यांपूर्वी तिच्याहून 16 वर्षांनी लहान असलेल्या रोहमनला बराच काळ डेट करत होती. दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते. अनेकदा ते फोटो आणि व्हिडिओ शेअर करून लोकांना कपल गोल्स देत होते. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचेही बोलले जात होते, पण नंतर अचानक एके दिवशी त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. सुष्मिताचे म्हणणे आहे की तिचे अजूनही रोहमनसोबत मैत्रीपूर्ण नाते आहे.

विक्रम भट्ट

एके काळी सुष्मिता चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांच्या प्रेमात आकंठ बु़डाली होती. सुष्मिताने विक्रम भट्ट दिग्दर्शित दस्तक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एकत्र काम करत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या प्रेमाच्या बातम्या रोजच चर्चेत येऊ लागल्या. या बातम्यांमुळे विक्रम भट्टची पत्नी अदितीने विक्रमपासून घटस्फोट घेतला होता, पण सुष्मिता आणि विक्रम भट्ट यांचे काही काळानंतर ब्रेकअप झाले.

संजय नारंग

सुष्मिता सेनचे नाव हॉटेल व्यावसायिक असलेल्या संजय नारंगसोबतही जोडले गेले होते. दोघेही अनेकदा  कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे. सुष्मिताने नारंगसोबतच्या नात्याबाबत सोशल मीडियावर पोस्टही लिहिली होती, त्यावेळी तिने, ती प्रेमात असल्याचं सांगितले होते, पण सुष्मिताचं हे नातंही फार काळ टिकलं नाही आणि दोघेही वेगळे झाले.

रणदीप हुड्डा

सुष्मिता सेनच्या आयुष्यात रणदीप हुड्डाही येऊऩ गेला. ‘कर्मा’ और ‘होली’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. सेटवर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. दोघे तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर दोघे वेगळे झाले.

इम्तियाज खत्री

सुष्मिता बिझनेसमन इम्तियाज खत्रीच्या प्रेमात पडली होती. तेव्हा सुष्मिता 36 आणि इम्तियाज 22 वर्षांचे होते. दोघांनी एकत्र रॅम्प वॉकही केला, मात्र काही दिवस डेट केल्यानंतर दोघेही वेगळे झाले. पण सुष्मिताने या नात्याबद्दल कधीच उघडपणे काही सांगितले नव्हते.

अनिल अंबानी

सुष्मिता सेनचे नाव उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासोबतही जोडले गेले होते. त्यांच्या डेटींगच्या बातम्यांनी बऱ्याच रंगल्या होत्या. या दोघांबाबत अनेक प्रकारच्या अफवा सुद्धा पसरल्या. पण दोघांनीही रिलेशनशिपच्या चर्चेला कधीच समर्थन दिले नाही.

पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रम

सुष्मिताचे मन पाकिस्तानचा देखणा क्रिकेटर वसीम अक्रमवरही जडले. त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी बरीच चर्चा झाली. असे म्हटले जाते की वसीम आणि सुष्मिता एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की दोघांनीही लग्न करण्याचे ठरवले होते. पण त्यांच्यात काहीतरी बिनसले आणि त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

ऋतिक भसीन

सुष्मिताचे नाव हृतिक भसीनसोबतही बरेच दिवस जोडले गेले होते. रेस्टॉरंटचा मालक असलेल्या  हृतिक भसीनसोबत सुष्मिताचे अफेअर ४ वर्षे चालले. दोघेही अनेकदा एकमेकांचा हातात हात घालून फिरायचे. झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्येही दोघे एकत्र दिसले होते. तसेच या रिसेप्शनमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता असेही म्हटले जाते. दोघेही लग्न करण्याचा विचार करत होते. पण अखेर सुष्मिताची ही प्रेमकहाणीही अयशस्वी ठरली आणि दोघांचे ब्रेकअप झाले.

बंटी सजदेह

सुष्मिता सेलिब्रिटी मॅनेजर असलेल्या बंटी सजदेहसोबतही रिलेशनशिपमध्ये होती. त्यावेळी बंटी हा सुष्मिताचा मॅनेजर होता आणि दोघेही अनेकदा एकमेकांचा हातात हात घालून फिरायचे पण नंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटादरम्यान सुष्मिताची चित्रपटाचे दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्याशी जवळीक वाढली होती. दोघांनी खूप वेळ एकत्र एकमेकांसोबत घालवायला सुरुवात केली होती.

ललित मोदी

याशिवायही सुष्मिताचे नाव अनेक लोकांसोबत जोडले गेले होते, मात्र तिचे प्रत्येक नाते अपयशी ठरले. 7 महिन्यांपूर्वीच तिचे रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाला होता. अशातच, काल ललित मोदींनी सुष्मितासोबत रोमान्स करतानाचे खासगी फोटो शेअर केले तसेच ते आणि सुष्मिता एकमेकांना डेट करत असल्याची घोषणा केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला, मात्र या नात्याबद्दल सुष्मिताच्या बाजूने कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.