सुष्मिता सेनला आला ह्रदयविकाराचा झटका, स्वत: पो...
सुष्मिता सेनला आला ह्रदयविकाराचा झटका, स्वत: पोस्ट शेअर करत दिली तब्येतीची माहिती (Sushmita Sen suffers heart attack, undergoes angioplasty, Actress herself shared this news with social media post)

अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सकारात्मक पोस्ट शेअर करत असते. सुष्मिताही आफल्या फिटनेसची खूप काळजी घेते आणि मनातल्या सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलते. पण एवढे करूनही सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

सुष्मिता सेनने स्वतः इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली, सुष्मिताने सांगितले की, भूतकाळात ती खूप वाईट टप्प्यातून गेली आहे. तिला हृदयविकाराचा झटका आला होता, दोन दिवसांपूर्वी तिची अँजिओप्लास्टी झाली. सध्या तिची प्रकृती ठीक आहे.

सुष्मिताने लिहिले- “माझे वडील म्हणायचे – तुमचे हृदय मजबूत आणि आनंदी ठेवा. ते तुमच्या वाईट काळात नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहते. जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते. मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता…अँजिओप्लास्टी करण्यात आली होती…स्टेंटही टाकण्यात आले होते. हृदय आता सुरक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्या हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले की माझे हृदय खरोखर मोठे आहे. वेळेवर मदत केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो… सर्व ठीक आहे आणि मी पुन्हा आयुष्य जगण्यास तयार आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते !!!!

सुष्मिताची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहते तिची काळजी करत आहे आणि कमेंट करून ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सेलेब्स देखील तिच्या प्रकृतीची विचारपूस करत आहे.