किन्नरच्या भूमिकेत दिसणार सुष्मिता सेन, अभिनेत्...

किन्नरच्या भूमिकेत दिसणार सुष्मिता सेन, अभिनेत्रीने शेअर केला ‘ताली’ मधला फर्स्ट लूक (Sushmita Sen Shares First Look Of Web Series Taali, Actress All Set To Play The Role Of Transgender Activist Gauri Sawant)

सुष्मिता सेन हिने आज सकाळी आपल्या इन्स्टा पोस्टद्वारे आगामी वेब सीरिज ‘ताली’चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यात ती एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंतची भूमिका साकारत आहे.

या सिरीजचा फर्स्ट लूक शेअर करताना सुष्मिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, ”ताली बजाऊंगी नहीं, बजवाऊंगी” यासोबतच पुढे लिहिले – या सुंदर व्यक्तीचे जीवन पडद्यावर मांडण्याची आणि त्यांची कथा जगासमोर आणण्याची संधी मला मिळाली यापेक्षा अभिमानाची आणि भाग्याची दुसरी गोष्ट असू शकत नाही. प्रत्येकाला त्यांचे जीवन सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.

या पोस्टमध्ये सुष्मिताचा लूक खूपच दमदार दिसत आहे. अभिनेत्री हिरव्या रंगाच्या साडीवर लाल रंगाची मोठी टिकली लावलेली आहे. तसेच तिच्या गळ्यात रुद्राक्षाची माळही दिसते. सुष्मिताची टाळी वाजवण्याची आणि व्यक्त करण्याची शैली अतिशय आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसत आहे. तिचा लूक पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. सुष्मिताची वहिनी चारूपासून ते तिच्या चाहत्यांपर्यंत अनेकजण तिच्या नव्या लूकचे कौतुक करत आहेत. कमेंटमध्ये कोणी तिला पॉवरफुल म्हणत आहेत तर कोणी सुंदर असे म्हणत आहेत.

सहा एपिसोडची ही वेब सिरीज रवि जाधव यांनी दिग्दर्शित केली आहे. यात ट्रान्सजेंडर कार्यकर्ते गौरी सावंत यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये गौरीला सुद्धा टॅग केले आहे.

मध्यंतरीची काही वर्षे सुष्मिता बॉलिवूडपासून दूर होती. त्यानंतर तिने आर्या या वेब सिरीजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. या सिरीजचे दोन्ही सीजन यशस्वी झाले. आता तिच्या ताली या सिरीजचा फर्स्ट लूक पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.