सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका : अँजिओप्लास्ट...

सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका : अँजिओप्लास्टी झाली, अभिनेत्री म्हणाली, ‘नवीन आयुष्य मिळाले…’ (Sushmita Sen Reveals She Suffered A Heart Attack, Shares Health Update)

सुष्मिता सेन बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर फिटनेसचे व्हिडिओही शेअर करते. नुकताच तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा सुष्मिता सेनने केला आहे. यानंतर तिची अँजिओप्लास्टी करावी लागली. आता ती ठीक आहे.

सुष्मिताने आपल्या तब्येतीबद्दलचा तपशील देताना चाहत्यांसाठी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘तुमचे हृदय नेहमी आनंदी आणि मजबूत ठेवा. कारण जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा ते तुमच्यासाठी असेल. काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. अँजिओप्लास्टी करावी लागली. स्टेंट लावले आहेत.’

माझ्या डॉक्टरांनी सांगितले आहे की माझे हृदय खूप मजबूत आहे. ज्यांनी वेळेवर माझी मदत केली आणि आवश्यक ती पावले उचलली, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. ही पोस्ट माझ्या चाहत्यांसाठी आहे. मी त्यांना आनंदाची बातमी देऊ इच्छिते की आता मी पूर्णपणे ठीक आहे आणि पुन्हा नवीन जीवन जगण्यासाठी तयार आहे.

सुष्मिता सेन ४७ वर्षांची आहे. ती बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर फिटनेसचे व्हिडिओही शेअर करते. सुष्मिताचे चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोक तिला आशीर्वाद देत आहेत.