सुष्मिता सेन हिने आयुष्याला कंटाळून आत्महत्या क...

सुष्मिता सेन हिने आयुष्याला कंटाळून आत्महत्या करायला निघालेल्या महिलेची आयुष्याप्रति वाढवली सकारात्मकता (Sushmita Sen gives strength to a female fan, who had lost hope in life, Actress writes-‘ You must hold on… To the faith, to love’)

आलिशान जीवनशैली जगण्यासाठी ओळखली जाणारी सुष्मिता सेन आपले आयुष्य स्वतःच्या अटींवर मनमुराद जगते. मग ते तिचे प्रेमीजीवन असो, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन असो किंवा इतर काहीही असो – सुष्मिता सेनचा बोल्डनेस तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो. तिची धाडसीवृत्ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी असते. यावेळीही असेच काहीसे घडले, यावेळी सुष्मिताने आपल्या आयुष्याला कंटाळलेल्या एका चाहतीला आयुष्याच्या सकात्मकतेचा सुंदर संदेश दिला आहे.

 ट्विटरवर सुष्मिताच्या एका चाहतीने तिच्यासोबतच्या वैयक्तिक आयुष्यातील वेदना शेअर केली. ती आयुष्याच्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात असून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला आहे असे ती म्हणाली. त्या चाहतीने सुष्मिताकडून सल्ला मागितला होता, तिच्या प्रश्नाचे उत्तर देताना सुष्मिताने तिला खंबीर राहण्याचा संदेश दिला.

त्या युजरने ट्विटरवर लिहिले, “तुमचा एकमेव वाघाचा टॅटू वगळता, तुम्ही बनवलेला प्रत्येक टॅटू मी माझ्या शरीरावर बनवला आहे. आज मला खूप एकटं वाटतंय. मी तुझ्यासारखीच खूप बलवान आहे आणि माझ्या अटींवर आयुष्य जगले आहे. पण, आज मी आत्महत्येचा प्रयत्न केला. मी माझ्या आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम केले आणि करते. मी यूएस मध्ये आहे आणि यूएसची नागरिक आहे. मी अकाउंटन्ट असून मला एक मुलगी आहे. मी घटस्फोट देऊ शकत नाही. माझ्या पतीने माझी फसवणूक करून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला माझ्याकडून घटस्फोट घ्यायचा आहे, पण मला ते नको आहे. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. कृपया मला सांगा मी काय करु?

आपल्या चाहतीला अडचणीत पाहून सुष्मिता सेननेही लगेचच तिला रिप्लाय देत खंबीर राहण्याचा संदेश दिला. सुष्मिताने लिहिले, ‘माझ्या शोना… मी तुझी वेदना समजू शकते. एक गोष्ट समजून घे की देवाने तुमच्यासाठी एक ठोस योजना बनवली आहे. उसके घर देर हे, अंधार नही. तुमच्यात हिम्मत असायला हवी. प्रेमावर, तुमच्या आयुष्यावर, तुमच्या मुलीवर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच जिंकाल. मी तुझ्यावर प्रेम करते!”

सुष्मिताच्या या एका संदेशामुळे त्या चाहतीला खूप फायदा झाला असेल हे वेगळे सांगायला नको. आपल्या चाहत्यांसाठी सुष्मिताची ही कळकळ तिच्या इतर चाहत्यांनाही आवडली आहे आणि ते अभिनेत्रीचे मनापासून कौतुक करत आहेत.