सुष्मिता सेनचे दरमहा उत्पन्न व संपत्ती किती आहे...

सुष्मिता सेनचे दरमहा उत्पन्न व संपत्ती किती आहे ते ऐकाल, तर चकित व्हाल (Sushmita Sen Earns This Much Every Month, You Will Be Stunned To Know Her Total Assets)

सुष्मिता सेन आता ४७ वर्षांची आहे. तिनं आपल्यापेक्षा वयाने १० वर्षे मोठ्या असलेल्या ललित मोदी या उद्योगपतीशी संबंध प्रस्थापित करून सोशल मीडिया गाजवला आहे. ललित मोदीने तिच्याशी असलेले आपले संबंध जाहीर करून खळबळ माजवली आहे. तिच्याशी लग्न करण्याच्या पण त्याने वल्गना केल्या आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

माहिती अशी मिळतेय्‌ की, ललित मोदींकडे जवळपास ४५०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. मग त्यांच्या तुलनेत सुष्मिताकडे किती संपत्ती आहे, असा लोकांना प्रश्न पडला आहे. त्याचा उलगडा आम्ही करत आहोत. मात्र एकेकाळची मिस युनिव्हर्स असलेल्या, या अभिनेत्री सुष्मिता सेनचे दरमहा उत्पन्न किती आहे व तिची मालमत्ता किती आहे, हे कळल्यावर तुम्ही चकित व्हाल!

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सुष्मिताने बॉलिवूडच्या अनेक चांगल्या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. त्यानुसार माहिती अशी आहे की, तिची मालमत्ता ७४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामध्ये ती राहत असलेल्या मुंबईच्या वर्सोवा विभागातील फ्लॅट सामील आहे. या फ्लॅटमध्ये ती दत्तक घेतलेल्या २ मुलींसह राहते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आणखी माहिती अशी पण आहे की, सुष्मिताने देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी घरांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. यशस्वी अभिनेत्री असल्याने तिच्याकडे आलिशान मोटारगाड्यांचा संग्रह आहे. यामध्ये एक कार बीएमडब्लू-७ आहे, जिची किंमत १.४२ कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे एक कोटी रुपये किंमतीची बीएमडब्लूएक्स-६ ही कार तिच्याकडे आहे. तर ८९.९० लाख रुपये किंमतीची ऑडी क्यू ७ आणि ३५ लाखांची लेक्सेस एलएक्स ७० या मोटार गाड्यापण आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सुष्मिताचे उत्पन्न बघाल तर ती वर्षभरात अंदाजे ८ कोटी रुपये कमावते. या हिशेबाने तिचे दरमहा उत्पन्न सुमारे ६० लाख रुपये येते. ती एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते. तर एखाद्या ब्रॅन्डची जाहिरात करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये घेते.

असंही सांगितलं जातं की, सुष्मिता एक रिटेल ज्वेलरी स्टोअर पण चालवते. आपली मुलगी रेनी हिचे नाव त्या स्टोअरला तिने दिलं आहे. तंत्र एन्टरटेनमेन्ट प्रॉडक्शन हाऊस आणि सेंसाजियोनी अशा कंपन्यांची पण ती मालकीण आहे. चित्रपटांव्यतिरीक्त सुष्मिता मॉडेलिंग आणि सोशल मीडियाद्वारे आणखी पैसे कमावते.