ललित मोदीं सोबतच्या नात्यामुळे ट्रोल होत असलेल्...

ललित मोदीं सोबतच्या नात्यामुळे ट्रोल होत असलेल्या सुष्मिताने सेल्फी शेअर करत चाहत्यांसाठी दर्शवले प्रेम (Sushmita Sen Drops ‘Gentle Reminder’ For Her Fans Amid Trolling Over Relationship Announcement with Lalit Modi)

आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबतचे त्यांचे नाते जाहीर केल्यानंतर सुष्मिता सेन सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा नवा फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांसाठीचे तिचे प्रेम दर्शवले आहे.

जेव्हापासून ललित मोदींनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची घोषणा केली, तेव्हापासून सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु झाली आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. कुणी सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ म्हणतं आहे, तर कुणी अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यावर बोटं दाखवत आहेत. ट्रोलिंगच्या या गोंधळा दरम्यान, अभिनेत्री सुष्मिता सेनने सोशल मीडियावर तिचा नवा फोटो शेअर केला आहे, तसेच चाहत्यांसाठी कॅप्शनमध्ये एक अतिशय सुंदर संदेशही लिहिला आहे.

सुष्मिताने तिचा लेटेस्ट सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सेल्फी फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले, “#gentlehappyreminder I love you!!! #duggadugga #yourstruly.” सुष्मिताने हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. अभिनेत्रीची मुलगी रिनीने तिच्या आईच्या पोस्टवर कमेंट करत “माझे तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम आहे… चर्चा बंद करा”असे म्हटले आहे.  तर एका युजरने माझी प्रेरणा बनण्यासाठी खूप आभार , खूप प्रेम अशी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे.

शेअर केलेल्या सेल्फीत सुष्मिता सेनने निळ्या रंगाचा टॉप घातला आहे. डोळ्यांवर काळ्या रंगाचा सनग्लासेस लावला आहे. तसेच फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आहे. केस मोकळे सोडले आहेत. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत आहे.

ललित मोदींनी जेव्हापासून सुष्मितासोबतच्या नात्याचा खुलासा केला तेव्हापासून अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे. नेटिझन्स सुष्मिताला चांगलेच ट्रोल करत आहेत.