सुशांत सिंहच्या नावाने निधी गोळा करू नका –...

सुशांत सिंहच्या नावाने निधी गोळा करू नका – त्याची बहीण मीतू सिंहने दिला इशारा (Sushant Singh’s Sister Meetu Singh Says Family Has Not Authorised Anyone to Raise Donations in His Name)

सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन एक वर्ष पूर्ण होत आले आहे, तरी आजही त्याचे कुटुंब, नातलग आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्या आठवणी बेचैन करतात. सुशांत सिंहच्या अचानक मृत्यूने त्याचं कुटुंब कोलमडलं आहे. अजूनही सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून ते स्वतःला सावरू शकले नाहीयेत. त्यातच मधेमधे काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियासमोर यावे लागत आहे. सुशांत सिंहची मोठी बहिण मीतू सिंहने आपल्या ट्वीटरवरुन या लोकांना इशारा दिलेला आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम आणि ट्वीटर

सुशांत सिंहची बहीण मीतू सिंहने मागोमाग तीन ट्वीट केले आहेत आणि सुशांत सिंहच्या नावाने निधी गोळा करणाऱ्या लोकांना इशारा दिलेला आहे.

फोटो सौजन्य : गूगल

मीतू सिंहने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय – ‘काही लोक आमच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा फायदा घेऊ इच्छित आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. लोकांकडून अशा प्रकारच्या माणुसकीला कलंक लावणाऱ्या कृत्याची अपेक्षा नव्हती. असे कृत्य करणाऱ्या लोकांनी आधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहावे… आमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोणालाही सुशांत सिंहच्या नावाने निधी गोळा करण्यास सांगितलेले नाही… आम्ही कुटुंबियांनाही या दुर्दैवी घटनेला पैसा मिळवण्याचे साधन बनवले नाही…आणि इतर कोणालाही तसे करू देणार नाही.’

फोटो सौजन्य : ट्वीटर

मीतू सिंहने आपल्या पोस्टमध्ये, ‘सुशांतची कोणतीही गोष्ट मग ती त्याची फिल्म असो वा पुस्तक किंवा त्याच्या कोणत्याही सामानाच्या बदली निधी गोळा करण्याची कोणालाही परवानगी नाही,’ अशा कडक शब्दात सुशांतच्या नावे निधी गोळा करणाऱ्यांना ताकीद दिली आहे. 

फोटो सौजन्य : गूगल

फोटो सौजन्य : ट्वीटर

१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह आपल्या घरी मृत्यावस्थेत सापडले होते, त्यावेळी त्याच्या कुटुंबातून मीतू सिंहच पहिली त्या ठिकाणी पोहोचली होती. सुशांतचे आपल्या बहिणींवर फार प्रेम होते. चार बहिणींचा लाडका भाऊ असलेल्या सुशांतच्या आत्महत्येने बहिणींना हेलावून सोडले होते.


फोटो सौजन्य : गूगल

फोटो सौजन्य: गूगल

सुशांत सिंह राजपूतच्या चार बहिणींपैकी तीन बहिणी या सोशल मीडियापासून दूर असून फक्त श्वेता सिंह कीर्ति एकटीच सोशल मीडियावर सक्रीय असते. आपल्या भावाबद्दलच्या भावना ती तिच्या पोस्टमध्ये शेअर करत असते. त्यावरून ती सुशांतच्या अधिक जवळ होती हे दिसते.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम और गूगल

फोटो सौजन्य: गूगल

सुशांत सिंह राजपूतचे कुटुंब सुशांतला न्याय मिळावा यासाठी आशा लावून बसले आहे. मागील काही दिवसांत सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील आणखी काही नवे दुवे हाती लागल्याचे कळते. पोलिसांनी कैद केलेल्या सिद्धार्थ पीठानी यांची एनसीबीने चौकशी केल्यानंतर, सुशांतचा मॅनेजर सॅमुअल मिरांडा याचं नाव घेतलं आहे. त्यामुळे एनसीबी कधीही सॅमुअलला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवू शकते.