अगदी सुशांत सिंह राजपूत सारखा दिसणारा कलाकार (S...

अगदी सुशांत सिंह राजपूत सारखा दिसणारा कलाकार (Sushant Singh Rajput’s Lookalike, Who Is Playing Sushant Singh In His Biopic)

सुशांत सिंहला जाऊन वर्ष सरत आलं, तरी त्याचा मृत्यू आजही एक प्रश्नचिन्ह होऊन बसलं आहे. पण त्याच्या जीवनावर जो चित्रपट येतो आहे, त्यात कदाचित हे प्रश्नचिन्ह उत्तरामध्ये बदलेल, अशी आशा आहे.

‘सुसाईड ऑर मर्डर’ असा चित्रपट सुशांतच्या जीवनावर तयार होत आहे. त्यामध्ये सुशांतची भूमिका सचिन तिवारी हा नट करतो आहे. तो अगदी सुशांत सारखा दिसतो. आता या सचिन तिवारीबद्दल जाणून घेऊया.

सुशांतच्या मृत्यूनंतर सचिनने टिकटॉकवर जे व्हिडिओ टाकले होते, त्यावरून तो प्रकाशात आला. त्याचे लूक, हावभाव, सर्वकाही सुशांतप्रमाणे दिसत होतं. इतकं हुबेहुब की, लोक त्याला सुशांतशी जोडू लागले. अन्‌ त्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.

या व्हिडिओज्‌मुळे आणि सचिनचे सुशांतशी असलेले साम्य, यामुळेच सुशांतच्या जीवनावर ‘सुसाईड ऑर मर्डर’ या चित्रपटाची आखणी सुरू झाली, तेव्हा सुशांतची भूमिका करण्यासाठी त्याची निवड झाली.

सचिन तिवारी, उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. अन्‌ सुशांतचा मोठा फॅन आहे. सुशांतची कार्बन कॉपी, असे त्याचे चाहते म्हणू लागले आहेत.

सुशांत या आपल्या आवडत्या कलाकाराच्या मृत्यूनंतर सचिनने देखील आपला आवाज उठवला होता.

आता टिकटॉकवर बंदी घालण्यात आली असली, तरी सचिन त्याच्यामुळेच लोकप्रिय झाला. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे.

सचिनचा चेहराच नव्हे, तर त्याचे हावभाव, चालण्याची ढब या सर्वच गोष्टी सुशांतशी मिळत्याजुळत्या आहेत. त्यामुळे सुशांतच्या भूमिकेला आपण न्याय देऊ शकू व लोकांचे प्रेम मिळवू, असा त्याला आशावाद आहे.

सुशांतच्या जाण्याने सचिन फारच दुःखी झाला होता. सतत सोशल मीडियावरून तो सुशांतला न्याय मिळावा म्हणून झगडत राहिला. आश्चर्याची गोष्ट अशी की, आपल्या चरित्रपटात सुशांत स्वतःच काम करायला उत्सुक होता. एका पत्रकार परिषदेत त्याने आपली ही इच्छा व्यक्त केली होती. त्याची इच्छा अपूर्ण राहिली, पण त्याच्या जीवनावर चित्रपट मात्र येतो आहे.