‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि R...

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्करची गळफास घेऊन आत्महत्या (Sushant Singh Rajput’s Friend, ‘Yeh Rishta Kya Kehlata Hai’ Fame Vaishali Thakkar Commits Suicide, Deets Inside)

टेलिव्हिजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी आली आहे. वैशाली ठक्कर या तरुण अभिनेत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही दुर्घटना इंदूरमध्ये घडली. वैशाली गेले वर्षभर तिथे राहत होती.

मिळालेल्या माहितीनुसार तिने लिहिलेले पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यातील मजकूर मात्र समजलेला नाही. प्रेमप्रकरणातून वैशालीने आपला अंत करून घेतला असावा, असा पोलिसांना संशय आहे. अधिक तपास चालू आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’,  ‘ससुराल सिमर का’ अशा लोकप्रिय मालिकांतून वैशालीने काम केले असून ती बिग बॉसमध्ये सुद्धा दिसली होती. ती सुशांत सिंह राजपूतची मैत्रिण होती. त्याच्या निधनानंतर, त्याला न्याय मिळावा या लढ्यात ती सामील झाली होती. वैशालीचे सुशांत सिहंशी नेहमी संभाषण होत असे. पण त्याने नंबर बदलल्यानंतर त्यात खंड पडला. आपल्या मित्राप्रमाणेच पंख्याला टांगून फाशी ती घेईल, हे कोणालाच कळले नाही.

वैशालीने लाल इश्क, विष या अमृत, सुपर सिस्टर्स, मनमोहिनी, ये है आशिकी, इत्यादी मालिकांमध्ये अभिनय केला होता. पण ‘ए रिश्ता क्या कहलाता है’ मधून तिने पदार्पण केले होते. त्यात तिने संजनाची भूमिका केली होती.

ती इंदूरला आपला भाऊ आणि वडिलांसह राहत होती. सकाळीच तिला पंख्याला लटकलेले पाहून ते चकित झाले.

गेल्या वर्षी, २८ एप्रिल २०२१ रोजी वैशालीचा साखरपुडा झाला होता. याची माहिती तिने स्वतःच इन्स्टाग्रामवर दिली होती. नंतर काही कारणांनी तिचे हे लग्न मोडले. केनिया येथील डॉक्टर अभिनंदन सिंह याच्याशी तिचा साखरपुडा झाला होता. मात्र तिच्या खासगी जीवनात चलबिचल चालली होती, असं ऐकिवात आहे. तरीपण ती असे पाऊल उचलेल, अशी कोणालाही कल्पना नव्हती. गेल्या काही दिवसांपासून वैशालीने सोशल मीडियाशी देखील फारकत घेतली होती.