ऋतिक रोशनचा स्टंटमॅन पाहून चाहत्यांना आली सुशां...

ऋतिक रोशनचा स्टंटमॅन पाहून चाहत्यांना आली सुशांत सिंह राजपूतची आठवण(Sushant Singh Rajput Fans Get Emotional After Seeing Hrithik Roshan’s Stuntman, Fans Say, He Is Late Actor’s Doppelganger)

सुशांत सिंह राजपूतला या जगाचा निरोप घेऊन अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण चाहते अजूनही त्याला विसरू शकलेले नाहीत. सोशल मीडियावर रोज त्याच्याबद्दल कोणतीना कोणती पोस्ट व्हायरल होत असते. आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांना असे काही दिसले आहे ज्यामुळे सुशांतच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशनचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हृतिकसोबत त्याचा स्टंटमॅनही दिसत आहे. हा थ्रोबॅक फोटो हृतिकच्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटाच्या सेटवरील आहे, ज्यामध्ये हृतिक मन्सूर अली खान नावाच्या स्टंटमॅनसोबत पोज देताना दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मन्सूर हुबेहुब सुशांतसारखा दिसतोय.त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याची आठवण आली आहे. चाहते आता ‘सुशांत सिंह राजपूत इज बॅक’ लिहून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘तो हुबेहूब सुशांत सिंह राजपूतसारखा दिसत आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘हृतिक रोशन सुशांतसोबत पोज देत असल्याचे दिसत आहे.’ सुशांतचे चाहते फोटोवर कमेंट करत आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाही की सुशांत आता या जगात नाही.

मन्सूरने गेल्या महिन्यात हृतिक रोशनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता आणि सोबत कॅप्शनमध्ये, ‘हॅप्पी बर्थडे भाऊ हृतिक रोशन असे लिहिलेले. तुम्ही शुद्ध मनाचे सुपरस्टार आहात, इतका मोठा सुपरस्टार असूनही तुमचे पाय अजूनही जमीनवर आहेत आणि इतके नम्र, इतके काळजी घेणारे, इतके प्रेमळ आहात. तुम्ही नेहमी इतरांच्या कलागुणांचे कौतुक आणि आदर करता. तसेच एक सुपर फ्रेंडली व्यक्ती.’ हा फोटो शेअर करून एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे पण आता हा फोटो व्हायरल होत आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू 2020 मध्ये झाला होता. आजही या अभिनेत्याचे चाहते त्याला विसरू शकले नाहीत.