सुशांत सिंह राजपूत ड्रग केस: रिया चक्रवर्तीचा स...

सुशांत सिंह राजपूत ड्रग केस: रिया चक्रवर्तीचा सनसनाटी खुलासा; सारा अली खान स्वतःहून गांजा आणि व्होडका ऑफर करायची… (Sushant Singh Rajput Drug Case: Rhea Chakraborty Statement To NCB Says, Sara Ali Khan Offered Me Ganja And Vodka)

सुशांत सिंह राजपूत ड्रग केसमध्ये रिया चक्रवर्तीने आता अनेक सनसनाटी खुलासे केले आहेत. रियाने एनसीबीला दिलेल्या आपल्या विधानामध्ये, सारा अली खान स्वतःहून सुशांतला गांजा आणि व्होडका ऑफर करत होती, अशी माहिती दिली आहे. एवढेच नाही तर रियाने सुशांतच्या बहिणीबाबतही असेच भाष्य केले आहे…

सुशांत सिंह राजपूत ड्रग केसमध्ये एकामागोमाग एक असे अनेक खुलासे समोर येत आहेत. अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येशी संबंधित ड्रग्स प्रकरणासंदर्भात रिया चक्रवर्तीने नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ला दिलेल्या माहितीमध्ये अनेक मोठे खूलासे केले आहेत. रियाने आपल्या विधानामध्ये म्हटलंय की, अभिनेत्री सारा अली खान देखील ड्रग्स घेत होती. रियाने सांगितलं की, सारा आपल्या हातांनी सिगरेटमध्ये ड्रग्स भरून सुशांतला देत होती. रियाने सांगितलं की तिने सारा अली खानसोबत अनेकदा स्मोक केलं आहे. झी न्यूजने दिलेल्या अहवालानुसार, रियाने एनसीबीला दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलंय की, सारा अली खानने तिला मारिजुआना आणि व्होडका ऑफर केला होता.

रिया चक्रवर्तीने, सारा अली खानसोबत जून २०१७ रोजी झालेल्या बातचीतीची माहिती एनसीबीला दिली आहे, ज्यात तिने म्हटलंय की, सारा अली खान मारिजुआना रोल्स बनवत होती आणि नंतर ते एकमेकांसोबत मार्जुआना ज्वॉइंट प्यायचे. दोघांच्या संभाषणामध्ये व्होडका आणि ड्रग्स बाबत बातचीत होत असल्याचे कळते.   

रिया चक्रवर्तीने एनसीबीला दिलेल्या माहितीमध्ये, सुशांतच्या परिवारातील सदस्यही ड्रग्स घ्यायचे असे सांगितले आहे. रियाने म्हटलंय की, सुशांतसोबत तिची बहिण आणि भावोजी देखील ड्रग्स घेत होते. खबरांनुसार रिया चक्रवर्तीने एनसीबीला सुशांतच्या बहिणीचे काही मेसेज दाखविले.  आणि ते एकत्र बसून ड्रग्स घेत असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

मागच्या वर्षी १४ जून २०२० ला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तो ड्रग्स घेत असल्याची बाब समोर आली होती. सुशांतच्या त्या केसची चौकशी अजूनही सुरू आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला तुरुंगात टाकले होते आणि आता ती जामीनावर आहे.

या प्रकरणात सारा अली खानची देखील चौकशी करण्यात आली आहे. परंतु सुशांतच्या केसची तपासणी अजूनही पूर्ण झालेली नाही. सुशांतचे कुटुंबिय आणि चाहते त्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत.