सुरेखा कुडची राजकारणी स्त्रीच्या भूमिकेत (Surek...

सुरेखा कुडची राजकारणी स्त्रीच्या भूमिकेत (Surekha Kudchi To Play A Ambitious Politician Woman’s Role)

सर्वसाधारणपणे खाष्ट सासू, खलप्रवृत्तीची महिला; अशा भूमिका साकार करणारी सुरेखा कुडची ही चरित्र अभिनेत्री, आता एका वेगळ्या भूमिकेत येत आहे.

‘तुझ्या रूपाचं चांदनं ‘ या कलर्स मराठी वरील मालिकेत माहेश्वरी, या राजकीय स्त्रीचं पात्र साकारत आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून बाहेर पडल्यानंतर सुरेखा या नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिचे ठसठशीत कुंकू आणि दागिन्यांनी मढलेले लूक आकर्षक दिसत आहे. ‘दत्ता या नायकाच्या आईची ही भूमिका असून ती करताना मला मनापासून आनंद होत आहे. या भूमिकेत वेगळेपणा आहे. कारण ही माहेश्वरी पाटील राजकीय क्षेत्रातील स्त्री आहे,” असे सुरेखाने सांगितले.
दत्ताची भूमीका रोहीत चंद्रा असून मयूर मोरे झाला आहे  सुशांत शेलार.