सप्तशृंगी देवीच्या भूमिकेत सुरभि हांडे (Surabhi...

सप्तशृंगी देवीच्या भूमिकेत सुरभि हांडे (Surabhi Hande In The Role Of New Devi)

कलियुगात जेव्हा असुरी शक्ती वरचढ होऊ लागली तेव्हा मनुष्य कल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांचा अवतार घेतला. नवनाथांचा महिमा प्रत्येक श्रद्धाळू माणसाला ठाऊक आहे. असं असलं तरी या विषयाला हात घालण्यास कोणी धजावले नव्हते. पण सोनी मराठी टी. व्ही. ने नवनाथांवर मालिका करण्याचे धाडस दाखवून ‘गाथा नवनाथांची’ ही नवी पौराणिक मालिका सुरू केली आहे.

या मालिकेमध्ये मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गोरक्षनाथ आदी नवनाथांच्या आत्तापर्यंत ऐकलेल्या कथा प्रेश्रकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळत आहेत. मच्छिंद्रनाथांची भूमिका अनिरुद्ध जोशी करत आहे.

विशेष म्हणजे या मालिकेत सप्तशृंगी देवीची भूमिका सुरभि हांडे करीत आहे. ‘जय मल्हार’ या पौराणिक मालिकेत म्हाळसाची भूमिका सुरभिने केली होती. ती इतकी गाजली की, तिची ओळख म्हाळसा झाली आहे.

या मालिकेत सर्वश्रुत असलेली मच्छिंद्रनाथ आणि देवी सप्तशृंगी यांची भेट पाहायला मिळेल. नाथपंथियांमध्ये सप्तशृंगी देवीला विशेष स्थान आहे. देवीच्या आशीर्वादाने मच्छिंद्रनाथांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतो, ही घटना मालिकेत पाहायला मिळेल.

सप्तशृंगी देवीची भूमिका करणारी सुरभि हांडे ही तशी कमी दिसली असली तरी म्हाळसाची भूमिका गाजवलेली गुणी अभिनेत्री आहे. वयाच्या १६ व्या वर्षी तिने ‘स्वामी’ या नाटकातून पदार्पण केलं. त्यानंतर रेडिओच्या सुगम संगीत कार्यक्रमाची ती संचालिका होती. तिचे वडील सुप्रसिद्ध गायक आहेत. त्यामुळे सुरभिला पण गाण्याची गोडी आहे. ‘आंबट गोड’ या कलर्स मराठीवरील मालिकेत ती खलनायिका होती. अन्‌ ‘अगंबाई अरेच्चा २’ या चित्रपटातही दिसली होती.