केरळमध्ये नौकेतून प्रवास करतानाचे अभिनेत्री सनी...

केरळमध्ये नौकेतून प्रवास करतानाचे अभिनेत्री सनी लियोनीचे साऊथ इंडियन लूकमधील बोल्ड फोटो झाले व्हायरल (Sunny Leone’s Boat Ride in Kerala, Bold Photos of Actress in South Indian Look Goes Viral)

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी सौंदर्यवती सनी लियोनी सध्या एका शुटिंगसाठी केरळमध्ये गेली आहे. तेथील स्वतःचे फोटो आणि व्हिडिओज्‌ ती सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससोबत शेअर करत आहे. सनी लियोनीला पाहण्यासाठी उत्सुक असलेले तिचे फॅन्स कायम तिच्या खाजगी तसेच ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर देखील सक्रीय असतात. त्यांच्या या प्रेम आणि उत्सुकतेपोटीच सनी नेहमी आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो त्यांच्यासोबत शेअर करत असते. आताही तिने आपले केरळमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit: Instagram

अलिकडेच सनी लियोनीने स्विमिंग पूलमध्ये एका वेगळ्या अंदाजाने उडी मारतानाचा व्हिडिओ शेअर केला होता आणि आता तिने केरळ येथे काढलेले आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती साऊथ इंडियन वेशात दिसत आहे. केरळच्या रंगात रंगलेल्या सनीने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या साऊथ इंडियन वेशभूषेतील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती नदीच्या मधोमध नौकेतून प्रवास करताना दिसत आहे.

Photo Credit: Instagram

साउथ इंडियन स्टाइलमध्ये तयार झालेल्या सनीने आपल्या कपाळावर तेथील संस्कृतीप्रमाणे टीका लावला आहे. तिने गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत. सोबत मॅचिंग बिंदी आणि हातातील बांगड्याही गुलाबी रंगाच्या आहेत. एका फोटोमध्ये सनी बोट चालवताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती आपला क्लोजअप शॉट देत आहे.

Photo Credit: Instagram

Photo Credit: Instagram

साऊथ इंडियन वेशभूषेतील सनीचा हा बोल्ड अवतार फॅन्सकडून प्रशंसनीय ठरत आहे. सनीने आपल्या फोटोंना कॅप्शन देत असे म्टटले आहे की,

Photo Credit: Instagram

‘भगवान के अपने देश केरल से मुझे प्यार हो गया है.’ तिच्या या कॅप्शनवरून असं वाटतंय की सनीला केरळ फारच आवडले आहे आणि तिच्या चाहत्यांना तिचे फोटो.

या आधी सनीचा एक पूल व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. ज्यातील तिचा स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्याचा अंदाज चाहत्यांना अतिशय आवडला. शिवाय पूलाच्या बाजूला उभी राहून सनीने जी पोज दिली आहे, त्या पोजने फॅन्स अतिशय खूश झाले आहेत.

कमालीची गोष्ट म्हणजे यावेळेस सनी स्विमींग ड्रेसमध्ये न दिसता पिवळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये आहे. सोबतच तिने हाय हिल्स आणि ब्लॅक कलरचा चश्मा लावला आहे. हा फोटो पोस्ट करून कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, ‘पोज देणं जरूरी आहे, मग ती पोज पडतानाची का असेना.’ सनीचा हा व्हिडिओ सगळ्या चाहत्यांनी खूपच पसंत केला आहे.

Photo Credit: Instagram

Photo Credit: Instagram

२०११ सालात ‘बिग बॉस ५’ मधील प्रवेशानंतर सनी लियोनी लोकप्रिय झाली. या कार्यक्रमादरम्यान तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि कार्यक्रमानंतर तिला महेश भट्ट यांच्या ‘जिस्म २’ या चित्रपटाची ऑफर आली. त्यानंतर सनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. लवकरच ती ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’ यांसारख्या चित्रपटांतून दिसणार आहे. याशिवाय एमएक्स प्लेअर चॅनेलवर तिची ‘अनामिका’ ही वेब सिरीजही प्रदर्शित होणार आहे.