सनी लिओनीची मालदीव बेटांवर मौजमस्ती : तिथून पाठ...
सनी लिओनीची मालदीव बेटांवर मौजमस्ती : तिथून पाठवले निळ्या बिकिनीतील मदमस्त फोटो (Sunny Leone Shares Hot Photos In Blue Bikini From Maldives)


बॉलिवूडची हॉटेस्ट आणि बोल्ड समजली जाणारी सनी लिओनी आपल्या कुटुंबासह मालदीव बेटांवर सहलीला गेली आहे. तिथून तिने आपले मदमस्त फोटो पाठवले आहेत. निळी बिकिनी घालून बीचवर काढलेले तिचे हे फोटो इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहेत.

आपला नवरा डॅनियल वेबर आणि तीन मुलांसह सनी लिओनी मालदीव बेटांवर मजा करते आहे. त्याचे फोटो तिने प्रसिद्ध केले आहेत.

सनीच्या या बोल्ड, मदमस्त फोटोंनी तिच्या चाहत्यांची चंगळ झाली आहे. मनमोकळेपणाने ते तिच्या या अदाकारीची प्रशंसा करत आहेत. अन् हार्टवाले इमोजी टाकून कमेंट्स देत आहेत.

शॅम्पेनची बाटली उघडून आनंद व्यक्त करत असतानाचा व्हिडिओ, सनीने शेअर केला आहे. “या स्वर्गात आपलं स्वागत आहे. इथं कोणतीही घाईगडबड करण्यास परवानगी नाही. फक्त माझ्याशिवाय! पार्टी करण्याचा व आयुष्यातील आनंद घेण्याची ही वेळ आहे.” असा मजकूर सनीने व्हिडिओसोबत लिहिला आहे.

सनी लिओनीच्या कामकाजाबाबत बोलायचं झालं तर तिने ‘शेरो’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. श्रीजीत विजयन या चित्रपटाचे दिग्दर्शक असून तो हिंदी बरोबरच मल्याळम्, तेलुगु आणि तामीळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय सनी, बॉलिवूडमध्ये आलेल्या श्रीशांत या क्रिकेटपटुसोबत ‘पत्ता’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.