सनी लिओनीच्या पाण्यातील फोटो शूटने केला कहर (Su...

सनी लिओनीच्या पाण्यातील फोटो शूटने केला कहर (Sunny Leone Sets The Temperature Soaring In Yellow Swimsuit)

सनी लिओनी आपली बोल्ड छायाचित्रे नेहमीच पोस्ट करत असते. तिची अशी छायाचित्रे लगेचच व्हायरल होतात. अशीच काही बोल्ड, गरमागरम छायाचित्रे तिने हल्लीच स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहेत. त्यात ती पोहण्याच्या पोषाखात दिसते आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिचे हे फोटो पाहून युजर्सनी भरपूर लाईक्स आणि कमेंट्‌स दिले आहेत.

फोटो  सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो  सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो  सौजन्य – इन्स्टाग्राम

एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्‌सव्हिला’ या रिॲलिटी शोच्या शूटिंगसाठी सनी लिओनी आता केरळमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी तिनं दाक्षिणात्य पद्धतीचे ड्रेस घातलेले आपले शूट प्रसारित केले होते. ती बोल्ड छायाचित्रे पण खूप व्हायरल झाली होती. वरील शो व्यतिरिक्त सनी विक्रम भट्ट यांच्या ‘अनामिका’ या वेब शोमध्ये देखील दिसणार आहे.

फोटो  सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो  सौजन्य – इन्स्टाग्राम

सनी सोशल मीडियावर बरीच हालचाल करीत असली तरी खूप दिवसांपासून ती कोणत्याही चित्रपटात किंवा वेब शोमध्ये दिसलेली नाही. २०१९ साली नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टी यांची भूमिका असलेल्या ‘मोतीचूर चकनाचूर’ मध्ये ती दिसली होती. आता ती केरळात असून कोका कोला, रंगीला व वीरमादेवी हे तिचे आगामी चित्रपट आहेत.