सनी लिओनीने सादर केला, न्यू ईयर पार्टीची रंगत व...

सनी लिओनीने सादर केला, न्यू ईयर पार्टीची रंगत वाढवणारा मस्तीभरा डान्स ‘मधुबन’ (Sunny Leone Presents Sizzling Dance ‘Madhuban’ For New Year Party)

सरत्या वर्षाचा निरोप घेणारे व नव्या वर्षाचे स्वागत करणारे ‘मधुबन’ शीर्षकाचे न्यू ईयर सॉन्ग सनी लिओनीवर (Sunny Leone) चित्रित करण्यात आले आहे. सारेगामा म्युझिक कंपनीने हा हॉट व्हिडिओ आल्बम्‌ सादर केला आहे.

Sunny Leone

मदमस्त सनी लिओनीच्या मस्त अदा आणि ठुमके यांनी नटलेले हे गाणे पार्टी साँगमध्ये लोकप्रिय होण्याची दाट शक्यता आहे. हे मस्तीभरे गाणे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी बसविले आहे. तर कनिका कपूरने आपल्या नशिल्या आवाजात गायले आहे. संगीत शारीब तोशी यांनी दिले आहे.

सारेगामाने या निमित्त चाहत्यांची एक स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये अरिंदम्‌ चक्रवर्ती हा चाहता पहिल्या क्रमांकाचा ठरला. या अरिंदम्‌ने या गाण्यात पुरुषाचा आवाज दिला आहे. तर शिविका प्रताप सिंह या दुसऱ्या क्रमांकाच्या कलाकारास सनी सोबत नृत्य करण्याची संधी मिळाली आहे.

Sunny Leone

या मस्तीभऱ्या गाण्याबाबत बोलताना सनी लिओनीने सांगितले, “सोशल मीडियावर ‘मधुबन’ला चाहत्यांनी उचलून धरलं आहे. २०२१ सालचा निरोप घेणारे व २०२२ सालाचे धूमधडाक्यात स्वागत करणारे हे गाणे मला सादर करायला मिळाले, ही मोठी घटना आहे.”