मराठमोळी शर्वरी वाघ आणि सनी कौशल यांच्यातील नात...

मराठमोळी शर्वरी वाघ आणि सनी कौशल यांच्यातील नाते केवळ मैत्रीचे की…..? सनीने केला खुलासा (Sunny Kaushal Discloses The Secret Of His Relationship With Sharvari Wagh)

अभिनेता सनी कौशलचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूरने प्रमुख भूमिका साकारली आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

याशिवाय सनी अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असतो. तो मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघला डेट करत असल्याचे बोलले जाते. मात्र या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. तरीही त्यांना अनेकदा एकत्र पाहिले जाते. शिवाय कतरीना आणि विकीच्या लग्नाला तसेच कतरीनाच्या वाढदिवसाला सुद्धा शर्वरी सनीच्या कुटुंबासोबत दिसलेली. त्यामुळे शर्वरीच कौशल कुटुंबाची छोटी सून असल्याचे म्हटले जाते.

मात्र आता सनी कौशलने त्याच्या आणि शर्वरीच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला. तो म्हणाला, ‘माझं आणि शर्वरीचं नातं काय आहे, यावर ज्या चर्चा होत आहे, त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. या बातम्यांमुळे, चर्चांमुळे आमच्या दोघांच्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही. आम्हाला दोघांनाही माहिती आहे की या चर्चा केवळ मनोरंजनासाठी आहेत. त्यावरून आम्हाला वेडंही ठरवलं जाईल. परंतु तेही आम्ही फार गंभीरपणे घेणार नाही.’

सनी पुढे म्हणाला, ‘शर्वरी स्क्रीनवर वेगळी आहे आणि खऱ्या आयुष्यात वेगळी आहे. चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची तिला उत्तम जाण आहे. आम्ही दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. त्यापेक्षा जास्त आमच्या दोघांमध्ये काहीही नाही.’