सुनिल शेट्टी, इशा देओल ‘हंटर टूटेगा नही, तोडेगा...
सुनिल शेट्टी, इशा देओल ‘हंटर टूटेगा नही, तोडेगा’ या वेब सिरीजमध्ये (Sunil Shetty – Esha Deol Appear In New Web Series ‘Hunter Tootega Nahi, Todega’)

बॉलिवूडच्या नावाजलेल्या कलाकारांना आता वेब सिरीजमध्ये काम करण्याचे आकर्षण निर्माण झाले आहे. त्याची प्रचिती ॲमेझॉन मिनी टी.व्ही. च्या ‘हंटर टूटेगा नही, तोडेगा’ या सिरीजने येते. या वेब मालिकेत सुनील शेट्टी एसीपी विक्रम या तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून इशा देओल आणि राहुल देव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

या वेब सिरीजचा प्रिमियर २२ मार्च रोजी मोफत होईल. बरखा बिश्त आणि करणवीर शर्मा देखील या साहसी दृश्यांनी परिपूर्ण असलेल्या मालिकेत दिसतील. शिवाय सारेगामा वरील गाजलेल्या बॉलिवूड गाण्यांच्या आधुनिक रचना त्यात असतील.


सुनिल शेट्टीचा एसीपी विक्रम म्हणजे वन मॅन आर्मी असणार आहे. “ही भूमिका वठवताना खूप धमाल आली. प्रेक्षकांना हा शो पाहताना मजा येईल,” अशी भावना सुनिल शेट्टीने व्यक्त केली. तर ट्रेलरचे अनावरण करताना इशा देओल म्हणाली, “वेळ कसा झटपट निघून जातो, आम्ही सगळे या दिवसाची वाट पाहत होतो आणि हा दिवस उगवला.”
“सगळ्या व्यक्तीरेखा विचारपूर्वक आणि सुंदर पद्धतीने शब्दबद्ध करण्यात आल्या असून माझे पात्र चपळ बुद्धी असलेले आहे. त्याचे स्वतःचे रूल बुक आहे,” असे राहुल देवने सांगितले.