सुबोध भावेचे समर कलेक्शन (Summer Collection By ...

सुबोध भावेचे समर कलेक्शन (Summer Collection By Versatile Marathi Actor Subodh Bhave)

उकाड्याचा आपल्याला कितीही कंटाळा असला तरी फॅशनसाठी उन्हाळा हा अतिशय उत्तम काळ समजला जातो. कारण तुम्हाला निवड करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध होत असतात.
सुबोधच्या रुपेरी केसांवर न जाता त्याच्या रुपेरी पडद्यावरील कारकीर्दीकडे पाहिल्यास सुबोध भावे नावाचे हे नाणे एकदम खणखणीत असल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

सुबोधच्या फोटोंमध्ये त्याचे नाव लिहिलेला सफेद रंगाचा शर्ट, दुसर्‍या फोटोमध्ये निळ्या रंगाचा शर्ट आणि जिन्स, सफेद आणि निळा कुर्ता आणि पायजमा घातलेला दिसतो आहे. सुबोधच्या चेहर्‍यावरील हास्यच सांगतंय की तो या कपड्यांमध्ये किती सुखद अनुभव घेत आहे. सुती कपड्यांचं हेच वैशिष्ट्य असतं की बाहेर कितीही उष्मा असला तरी ते आपल्याला गारव्याचा अनुभव देतात.

उन्हाळ्यात सन बर्न सारख्या समस्या जास्त उद्भवतात. अशावेळी देखील सुबोधने निवडलेला ड्रेसिंग सेन्स फायदेशीर ठरतो. सुती फुल स्लीव असलेले शर्टस्, टी-शर्टस् आणि कुर्ता घातलेल्या पेहरावामध्ये कपड्यांच्या क्वॉलिटीमुळे सुबोधच्या व्यक्तिमत्त्वास क्लासी लूक आलेला आहे. शिवाय त्याच्या फोटोंकडे पाहताना आपणासही त्याचा कंफर्टेबल फिल अनुभवण्यास मिळतो.

सुबोधबद्दल आणखी काही बोलायचं तर, नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनय कौशल्याने त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याने अनेक विविधांगी भूमिकांना न्याय दिला आहे.

लोकमान्य- एक युगपुरुष, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली, डॉ. काशिनाथ घाणेकर या चरित्रपटांतून सुबोधने तो चतुरस्र अभिनेता असल्याची छाप पाडली आहे. आणि आता तर सुबोध बिगएफएम सारख्या मोठ्या व्यासपीठावर रेडिओ होस्ट अशी नवीन जबाबदारी लिलया पेलतो आहे. मबायस्कोपफ नावाचा मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांवर प्रकाशझोत टाकणारा हा शो आहे.

सुबोध भावेच्या या कुल, क्लासी अन् कंफर्टेबल लूकचे सौजन्य तानया विजयकर यांच्या बेन्झ फॅशनचे समर कलेक्शन आणि फोटोग्राफर रोहन मंत्री यांचेकडे जाते.