जॅकलीन फर्नांडिसने सुकेश चंद्रशेखर विरोधात पहिल...

जॅकलीन फर्नांडिसने सुकेश चंद्रशेखर विरोधात पहिल्यांदाच लावले धक्कादायक आरोप (‘Sukesh Chandrashekhar played with my emotions, ruined my career and my livelihood’ Jacqueline Fernandez makes shocking revelations to Delhi Court)

जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक दिवसांपासून कॉनमन सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्यामुळे अडचणीत सापडली आहे. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने तिलाही आरोपी बनवले आहे. या प्रकरणात जॅकलीनने पहिल्यांदाच सुकेशविरोधात धक्कादायक विधान केले असून सुकेशने भावनांशी खेळून आपले आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त केल्याचे न्यायालयाला सांगितले.

जॅकलिनने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सांगितले की, “कॉनमन सुकेश चंद्रशेखरने माझ्या भावनांशी खेळून माझे जीवन नरक बनवले आहे.” सुकेशने माझी दिशाभूल केली, माझे करिअर आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्याला गृह आणि कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्याचे मला नंतर समजले. सुकेशच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती मिळाल्यावर आपल्याला त्याचे खरे नावही कळले, असे जॅकलीनचे म्हणणे आहे.

जॅकलीनने न्यायालयात सांगितले की, सुकेशने सन टीव्हीचा मालक म्हणून स्वत:ची ओळख करून दिली. तसेच जे. जयललिता आपल्या मावशी असल्याचे सांगितले होते. चंद्रशेखर (सुकेश चंद्रशेखर) म्हणाला की, तो माझा खूप मोठा चाहता आहे आणि मी साऊथचे चित्रपटही करायला हवेत. सन टीव्हीचा मालक म्हणून आपल्याकडे अनेक प्रोजेक्ट्स असून आपण साऊथच्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे तो म्हणाला.

जॅकलीन म्हणाली, “पिंकी इराणीला चंद्रशेखरची माहिती होती. पण तिने मला कधीच याबद्दल सांगितले नाही. पिंकीने माझा मेकअप आर्टिस्ट शान मुथाथिलला आश्वासन दिले की तो (चंद्रशेखर) गृह मंत्रालयाचा अधिकारी आहे. पिंकी इराणीनेच सुकेशची जॅकलिनशी ओळख करून दिली होती.

 सुकेश आपल्याला दिवसातून किमान तीन वेळा कॉल आणि व्हिडिओ कॉल करायचा असेही ती म्हणाली. तसेच ‘तो माझ्या शूटच्या आधी सकाळी, दिवसा आणि कधी रात्री झोपण्यापूर्वी फोन करायचा. पण तो तुरुंगातून फोन करतोय की तुरुंगात आहे हे त्याने कधीच सांगितले नाही. पडद्यामागच्या एका कोपऱ्यातून तो फोन करायचा आणि तेव्हा पाठीमागे एक सोफा दिसायचा.

जॅकलिन पुढे म्हणाली, “सुकेश मला सांगायचा की तो त्याच्या प्रायव्हेट जेटने प्रवास करतो. मी केरळला गेल्यावर त्याने मला त्याचे खाजगी जेट दिले. केरळमध्ये माझ्यासाठी हेलिकॉप्टर राईडही आयोजित करण्यात आली होती. सुकेशला मी फक्त दोनदा भेटलो, तेही चेन्नईत. दोन्ही वेळा मी त्याच्या प्रायव्हेट जेटने प्रवास केला. जॅकलीन फर्नांडिसने दावा केला आहे की 8 ऑगस्ट 2021 रोजी ती सुकेशशी शेवटचे बोलली होती. यानंतर तिने किंवा सुकेशने कोणीच संपर्क साधला नाही. नंतर सुकेशला अटक झाल्याचे जॅकलिनला कळले.

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची अनेकदा चौकशी झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, ईडीने जॅकलिन फर्नांडिसचे नाव सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून ठेवले होते.