होळीच्या दिवशी सुकेशने पुन्हा एकदा जॅकलीनवर केल...

होळीच्या दिवशी सुकेशने पुन्हा एकदा जॅकलीनवर केला प्रेमाचा वर्षाव, तुरुंगातून पत्र लिहून प्रेमाचे आश्वासन दिले, लिहिले – मी तुझ्या आयुष्यातील रंग १०० पटीने परत करीन. (Sukesh Chandrasekhar Writes Letter to Jacqueline Fernandez on Holi, Promises to ‘Return Colours’ in Her Life’)

जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक दिवसांपासून कॉनमन सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्यामुळे अडचणीत सापडली आहे. २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही ईडीने त्याला आरोपी बनवले आहे. जॅकलीनने या नात्याला नकार दिला असला तरी सुकेश मात्र जॅकलीनवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. आता होळीच्या निमित्ताने सुकेशने पुन्हा जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिहिले आहे.सुकेशने पत्रात जॅकलीनला होळीच्या शुभेच्छा देणारा संदेश लिहिला असून, जॅकलीनला जगातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती असे म्हटले आहे. तर, सुकेशने जॅकलीनच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरण्याचे आश्वासन दिले आहे.

सुकेशने या पत्रात तिला होळीच्या शुभेच्छा देताना लिहिले आहे की, ‘मी माझ्या जॅकलीनला माझ्या आयुष्यातील सर्वात अद्‌भूत व्यक्तीला होळीच्या शुभेच्छा देतो. होळीच्या दिवशी अर्थात रंगांच्या या सणादिवशी मी तुला वचन देतो की, तुझ्या आयुष्यातून गायब झालेले सगळे रंग मी परत आणीन. मी वचन देतो आणि ही माझी जबाबदारीही आहे.’

सुकेशने या पत्रात पुढे लिहियले की, ‘तुला माहित आहे की, मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईन, माझे तुझ्यावर प्रेम आहे. नेहमी हसत राहा.’ यासोबतच त्याने जॅकलीनला ‘लव्ह यू माय प्रिन्सेस, मिस यू, माय बी, माय बोम्मा, माय लव्ह’ असंही लिहिलं आहे. यासोबतच सुकेशने पत्रात त्याचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबत सुकेशचे संबंध होते. मात्र, जॅकलीनशिवाय नोरा फतेही आणि इतर अनेक अभिनेत्रींची नावेही त्याच्यासोबत जोडली गेली आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, सुकेशने जॅकलीन आणि तिच्या कुटुंबावर तब्बल १० कोटी रुपये खर्च केले आहेत आणि जॅकलीनला देखील महागडे गिफ्ट्स दिले आहेत. सुकेश जॅकलीनला मुंबईहून चेन्नईला बोलावण्यासाठी चार्टर्ड विमान पाठवत असे, ज्यावर सुमारे ८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तुरुंगात गेल्यानंतरही सुकेश बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवत होता.