सुहाना खानच्या बिकिनी लूकने सोशल मीडियाचे तापमा...

सुहाना खानच्या बिकिनी लूकने सोशल मीडियाचे तापमान वाढवले (Suhana Khan’s Bikini Look Raises The Temperature On Social Media)

शाहरुख खानची लाडकी लेक असलेली सुहाना खानचे बिकिनी घातलेले फोटो सोशल मीडियावर फारच जोमाने व्हायरल होत आहेत. आपल्या समवयस्क मैत्रिणींसोबत सुहाना स्विमिंग पूलमध्ये मौजमस्ती करताना दिसत आहे.

शाहरूख आणि गौरी-खानच्या या लाडक्या मुलीने काही दिवसांपूर्वीच आपला २१वा वाढदिवस साजरा केला होता. त्या निमित्ताने मित्रमैत्रिणींसह मौजमस्ती करतानाचे फोटो सुहानाने प्रसिद्ध केले होते. ते खूपच व्हायरल झाले होते. आता हे बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतानाचे जे फोटो तिने प्रसिद्धीस दिले आहेत, त्याच्याने जणू सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे.

अलाना मार्कल आणि प्रियंका गेडिया या सुहानाच्या जीवलग मैत्रिणींने हे स्विमिंग पूलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामध्ये सुहाना व तिच्या मैत्रिणी बिकिनी व मोनोकिनीमध्ये बागडत आहेत.

सुहाना आपल्या मैत्रिणींच्या मागे उभी आहे. त्यामुळे तिने नेमकी बिकिनी घातलीय्‌ की मोनोकिनी, ते स्पष्ट दिसत नाहिये. मात्र त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर वणव्यासारखे वेगाने पसरत आहेत.

अलाना मार्कल या आपल्या मैत्रिणीच्या फोटोवर सुहानाने कमेंट दिली आहे. रेड हार्ट आणि इमोजी टाकून तिने आपली पसंती दिली आहे. हे फोटो पाहून तिचे चाहते बेहद खूश झाले असून, मनापासून आपल्या कमेंटस्‌ व लाइक्स देत आहेत.

सुहानाचे बर्थडे फोटो आणि व्हिडिओ पण व्हायरल होत आहेत.

सुहानाने या बर्थडेला मित्रपरिवारासह शानदार पार्टी दिली होती. शिवाय रंगीबेरंगी फुग्यांसह खेळत असलेल्या सुहानाचा एक व्हिडिओ पण प्रदर्शित झाला आहे.

इन्स्टाग्रामवर सुहानाचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे.

२१ वर्षांची तरणीबांड सुहाना, आताशा न्यूयॉर्कमध्ये शिकत आहे. तिनं बॉलिवूडमध्ये अद्याप प्रवेश केलेला नाही. सेलिब्रेटी नसूनसुद्धा सुहानाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहते आहेत, हे नवल आहे. इन्स्टाग्राम वर याबाबत ती कोट्याधीश आहे. म्हणूनच तिचे फोटो आणि व्हिडिओज्‌ना जबरदस्त प्रसिद्धी मिळते.