२२ वर्षांची झाली सुहाना खान, गौरी खानने लेकीचा ...

२२ वर्षांची झाली सुहाना खान, गौरी खानने लेकीचा बोल्ड अनसीन फोटो केला शेअर, तर बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेनेही बालपणीचा फोटो शेअर करत खास अंदाजात दिल्या शुभेच्छा! (Suhana Khan turns 22 : Mom Gauri Khan And Bestie Ananya Panday Share Cute Unseen Pictures)

गौरी आणि किंग खान यांची लाडाची लेक सुहाना खान आज तिचा २२ वा जन्मदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिची आई गौरी खानने आपल्या मुलीचा एक आधी पाहण्यात न आलेला फोटो शेअर केला आहे. सुहानाचा हा फोटो बऱ्यापैकी बोल्ड आहे, अन्‌ त्यात ती फार सुंदर दिसत आहे. सुहानाने प्रिंटेड कोट घातलेला आहे. पिंक कलरची बॉटम आणि पिंक कलरचेच फुटवेअर घातलेले आहे. सुहानाने केस मोकळे सोडले आहेत. तिचा हा फोटो वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र लोकप्रिय होत आहे.

गौरीने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय – बर्थ डे गर्ल आणि किसचा ईमोजी टाकला आहे. सुहानाच्या या फोटोला अनेक सेलेब्सनी लाइक केले आहे अन्‌ कमेंट्‌सही लिहिल्या आहेत. मनीष मल्होत्रा ते फराह खान आणि करण जौहरने देखील सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहतेही यावर सकारात्मक कमेंट्‌स देत आहेत तसेच हा फोटो अतिशय क्युट आहे, असेही म्हणत आहेत. चाहते सुहानाला आता मोठ्या पडद्यावर पाहू इच्छिताहेत. आम्ही द आर्चीजची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे दिसते.

https://www.instagram.com/p/CdVAGcUI9no/

सांगायचं म्हणजे, सुहाना ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहे. तिच्यासोबत या चित्रपटामध्ये आणखी दोन स्टार किड्‌सही डेब्यू करत आहेत. एक श्रीदेवी आणि बोनी कपूरची छोटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चनची नात अगस्त्य नंदाही यात दिसणार आहे. हा चित्रपट लोकप्रिय कॉमिक्स आर्चीजवर आधारित आहे.

गौरी व्यतिरिक्त सुहानाची मैत्रिण अनन्या पांडेने, त्या दोघींचा किशोरवयीन फोटो शेअर केला आहे आणि दुसरा दोघांच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. आणि या दोन्ही फोटोंमध्ये त्या दोघी फारच गोड दिसत आहेत. अनन्याने फोटोवर लिहिलंय – माझ्या सगळ्यांत आवडत्या मैत्रिणीला जन्मदिवसाच्या शुभेच्छा, जी मनानेही अतिशय सुंदर आहे. लव यू सो सो मच पिक्सी…

सुहानाच्या आणखी एका बेस्टी शनाया कपूरनेही दोघींचा एक हॉट पिक शेअर करून लिहिलं आहे – सिस्टर्स बाय हार्ट म्हणजे सख्ख्या बहिणी! आणि हार्टचा ईमोजी पोस्ट केला आहे.