शाहरुख खानची लाडाची लेक सुहाना खान झाली २१ वर्ष...

शाहरुख खानची लाडाची लेक सुहाना खान झाली २१ वर्षांची; गौरी खानने दिल्या गोड शुभेच्छा! (Suhana Khan Turns 21,Gauri Khan Wishes on Her Birthday)

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि गौरी खान यांची लाडकी लेक सुहाना खान आज २१ वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवशी तिची आई गौरीने सोशल मीडियावर सुहानाचा एक सुंदर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गौरीने शेअर केलेल्या फोटोत पोलका डॉट ड्रेस परिधान केलेली सुहाना एका खुर्चीवर बसलेली दिसतेय. या फोटोला कॅप्शन देत गौरी म्हणालीय, “तुझ्यावर आज..उद्या आणि कायमच प्रेम राहिल.” तर आईच्या या पोस्टवर सुहानाने देखील “आय लव्ह यू” असं म्हटलं आहे.

सुहानाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असून तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सुहानाचे बोल्ड अंदाजातले फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

लंडनला आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर सुहाना खान सध्या न्यू यॉर्कमध्ये फिल्म मेकिंग आणि अभिनयाचं शिक्षण घेत आहे. सुहानाने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सुहानाचे पप्पा शाहरुख खानने, सुहानाला लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची इच्छा होती, असं यापूर्वीच सांगितलं होतं. परंतु ती चित्रपटात कधी येईल हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. 

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टार किडस् चर्चेत आहेत. यात शाहरुख खानची लेक सुहाना कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सुहानाचे चाहते तिला हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु सध्या सुहाना आपल्या अभ्यासात व्यग्र आहे. आज सुहानाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.