पाठ उघडी टाकणारा गाऊन घालून सुहाना खानचे ग्लॅमर...

पाठ उघडी टाकणारा गाऊन घालून सुहाना खानचे ग्लॅमरस् फोटो शूट (Suhana Khan Sets Internet On Fire, As She Goes Backless In Her Latest Photoshoot)

शाहरूख खानची लाडाची लेक सुहाना खान, ‘द अर्चीज्‌’ या चित्रपटामधून पदार्पण करत आहे. तिच्या सोबत अमिताभचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर या चित्रपटातून पदार्पण करत आहेत.

पण सुहाना खानला त्याआधी प्रसिद्धी मिळवण्याची घाई झाली आहे. कारण तिने इन्स्टाग्रामवर आपला एक बेहद्द हॉट आणि ग्लॅमरस्‌ फोटो प्रकाशित केला आहे. हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. कारण त्यामध्ये सुहाना यापूर्वी कधीच दिसली नव्हती, एवढी हॉट दिसते आहे.

सुहानाने पाठ उघडी टाकणारा काळा गाऊन घातला आहे. अन्‌ हाय बन बनविला आहे. या ड्रेसमध्ये तिचा कमनीय बांधा दिसून येत आहे. सुहानाचा मेकअप मिनिमल व नॅचरल दिसतो आहे. तिचा फोटो चाहत्यांना आवडला आहे व ते तिची तारीफ करत आहेत.

काही लोक मात्र तिची निंदा करत आहेत. याआधी देखील सुहानाने लाल साडीवर बॅकलेस ब्लाऊज घातलेला फोटो प्रदर्शित केला होता.

त्यानंतर तिची आई गौरी खानने, मनीष मल्होत्राचा सफेद लेहंगा घातलेला सुहानाचा फोटो टाकला होता. तोही लोकांना आवडला होता.