मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत साडी नेसून आल...

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत साडी नेसून आलेल्या सुहाना खानला पुन्हा केलं ट्रोल, युजर्सनी तिचं चालणं रोबोटसारखं असल्याचं म्हटलं (Suhana Khan At Manish Malhotra’s Diwali Party Got Trolled For Her Saree Getup)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) ची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. अर्थात बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधीपासूनच सुहाना तिच्या या लुकमुळे, स्टाईलमुळे आणि तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते. नुकतेच मनीष मल्होत्रा यानं त्याच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. (Manish Malhotra Diwali Party) या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी सहभागी झाली होती. त्यात सुहाना देखील सहभागी झाली होती.

गोल्डन कलरच्या सिक्विन साडीमध्ये सुहाना खान खूपच क्यूट दिसत होती. सुहानाचा पार्टीमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओमधील सुहाना खानचा साडीचा लुक आणि चालण्याची ढब चाहत्यांना अजिबात आवडली नाही. तसंच सुहाना देखील त्या साडीमध्ये कम्फर्टेबल नव्हती. त्यातील तिचा वावर सहज नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी तिच्या लुकवर नकारात्मक कॉमेन्ट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तिला चालता येत नाही आणि पल्लू बाहेर काढायला विसरली वाटतं’. एकाने लिहिलंय ‘तुम्ही या साडीसाठी खूप लहान आहात, मनीष काकांना तुमच्या आकाराची साडी बनवायला सांगा’. काहींनी तिच्या लुकवर कॉमेन्टमध्ये म्हटलं आहे की, ‘हिला साडी नीट सांभाळताच येत नाही.’ तर काही नेटकऱ्यांनी सुहानाचं साडीतील चालणं हे रोबोट सारखं असल्याचं म्हटलं आहे.