सुहानाने आर्यनचे लहानपणीचे फोटो शेअर करून खास अ...

सुहानाने आर्यनचे लहानपणीचे फोटो शेअर करून खास अंदाजात व्यक्त केला आपला आनंद (Suhana Expressed Joy for Aryan Khan After His Bail, Showered Love on Her Brother by Sharing a Childhood Photos)

क्रूझ ड्रग्स प्रकरणामध्ये अडकलेल्या आर्यन खानला शेवटी दिलासा मिळाला आहे. काल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला आहे. तीन आठवड्यांच्या तुरुंगवासानंतर आर्यनच्या जामीनाची बातमी कळताच त्याच्या कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. त्याच्या जामीनाच्या बातमीने शाहरूख-गौरी आणि सुहाना व्यतिरिक्त बॉलिवूड सेलेब्सनेही आनंद व्यक्त केला आहे. सुहानाने आपल्या भावाच्या सुटकेनंतर खास अंदाजात आपला आनंद व्यक्त केला आहे. सुहानाने तिच्या इन्स्टाग्रामवर बालपणीच्या फोटोंचे कोलाज शेअर करून आपल्या भावावरील प्रेम व्यक्त केले आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

सुहाना खानने आपल्या भावाच्या आर्यन खानच्या जामीनानंतर इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि भावासोबतच्या बालपणीच्या फोटोंचा कोलाज ‘आय लव्ह यू’ अशी कॅप्शन लिहून पोस्ट केला आहे. सुहानाची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहे. या कोलाजमध्ये सुहाना आणि आर्यन आपल्या वडिलांसोबत खेळताना दिसत आहेत. तसेच शाहरुखही आपल्या मुलांसोबत अतिशय आनंदात दिसत आहे.

फोटोंमध्ये आर्यन आणि सुहाना कॅमेरासाठी वेगवेगळे एक्सप्रेशन देत आहेत. सुहानाची ही पोस्ट चाहत्यांनाही खूप आवडली असून त्यांनी देखील कमेंटमध्ये हार्ट इमोजी शेअर करून सुहाना आणि आर्यन यांच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे. त्याचबरोबर सुहानाच्या या पोस्टचे कौतुक केले आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

सुहाना व्यतिरिक्त, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने देखील आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर लगेचच एक पोस्ट शेअर करून आर्यनच्या सुटकेबद्दल देवाचे आभार मानले. तिने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये देवाचे तसेच आर्यनसाठी प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. सत्याचा नेहमीच विजय होतो, असं तिनं लिहिलं आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

3 ऑक्टोबरपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानचे संपूर्ण प्रकरण पूजा ददलानीने हाताळले आहे. आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख एकदाच आर्थर रोड जेलमध्ये जाऊ शकला, पण पूजा आर्यन खानशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचे अपडेट शाहरुखला पाठवत होती.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

बऱ्याच दिवसांनंतर आर्यनला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने तो आता त्याच्या घरी कुटुंबियांकडे जाऊ शकला आहे. आर्यनशिवाय अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही या प्रकरणात जामीन मिळाला आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहता २ ऑक्टोबर रोजी क्रूझ जहाजावर एनसीबीने टाकलेल्या छाप्यात अनेक लोकांसह आर्यन खानलाही अटक करण्यात आली होती. एनसीबीने आर्यन खानवर ड्रग्ज सेवन आणि ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप केला होता, मात्र आर्यनने हे आरोप फेटाळून लावले होते.