दुष्काळात तिची होरपळ (Sufferings Of Women In Wa...

दुष्काळात तिची होरपळ (Sufferings Of Women In Water Famine)

दुष्काळात तिची होरपळ

 • सुधीर सेवेकर
  पुस्तकाच्या लेखिका डॉ. आरतीश्यामल जोशी या स्त्रीवादी अभ्यासक आणि पत्रकार असून मूळच्या बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सच्या पदवीधर आहेत. त्या आस्था जनविकास संस्था या एनजीओच्या संस्थापक असून त्या माध्यमातून त्यांचे महिला व बालकल्याण क्षेत्रात सामाजिक कार्य चालू असते.
  तिचं आयुष्य पाण्यानं होरपळलंय तरीही ती धडपडतेय पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी! अशा प्रत्येकीसाठी अशा हृद्य शब्दात त्यांनी या पुस्तकाच्या आरंभीच त्यांची अर्पणपत्रिका लिहिलीय. प्रस्तूत लेखन त्यासाठी केलेल्या भरपूर मफिल्डवर्कफ वर आधारित आहे. भरपूर फोटो आणि खर्‍याखुर्‍या हकीकतींमुळे या पुस्तकास एक प्रामाणिकपणा लाभलेला आहे. ते केवळ दुष्काळाचे वार्तांकन ठरत नाही.
  पुस्तकाचे त्यांनी दोन भाग केलेले आहेत. पहिल्या भागात दुष्काळ संकल्पना, स्वरुप आणि इतिहासाची मांडणी करून महाराष्ट्राच्या जलस्थितीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. जगातील महाभयंकर दुष्काळांचाही मागोवा घेतलेला आहे. पाण्याच्या संकटामुळे सर्वात जास्त फटका बसतो तो स्त्रीजीवनाला, याचीही मांडणी यात केली आहे. या पहिल्या भागात भरपूर आकडेवारी, माहिती आणि तपशील त्यांनी अभ्यासपूर्वक संकलित केलेला आहे. मदुष्काळातील तिच्या यातनाफ, या दुसर्‍या भागात लेखिका डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी यातनांच्या विविध स्वरुपाच्या फिल्डवर्कमध्ये आढळलेल्या वीसेक केसेस मांडलेल्या आहेत.
  आर्थिक जीवन, अपघात, लैंगिक जीवन, कुपोषण, शिक्षणाचा उडालेला बोजवारा अशा विविध पैलूंच्या हकीकती वाचताना मन विषण्ण होते. या परिस्थितीवर लेखिकेने उपाययोजनाही सुचविल्या आहेत. तरीही याबाबत लेखिकेने आणखीन सडेतोडपणे डोळ्यात अंजन घालणारे, पाण्याबाबतचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारे लेखन करायला हवे होते, असे मात्र हे पुस्तक वाचताना जाणवते. असो.
  दुष्काळ, अवर्षण, पाणीसंकट, यावरचे स्त्रीच्या भूमिकेतील हे पुस्तक या संदर्भात निश्चितच महत्त्वाचे आहे. डॉ. आरतीश्यामल जोशी यांची मजाहिरातीतील तीफ, मतिच्यासाठी कचराफ आणि तिच्यासाठी लॉकडाऊनफ ही पुस्तकेही महत्त्वाची आहेत.
  पुस्तकाचे नाव – दुष्काळात तिची होरपळ
  लेखिका – डॉ. आरतीश्यामल जोशी
  प्रकाशक – आस्था पब्लिकेशन्स
  औरंगाबाद
  पृष्ठसंख्या – 112
  किंमत – रुपये 170/-