शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सुबोध भावे (Subodh ...

शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सुबोध भावे (Subodh Bhave To Play The Role Of Shivaji Maharaj)

मराठी चित्रसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे म्हणजे चरित्रपटांतील नायक असे जणू समीकरण झाले आहे. कारण त्याने आजवर मराठी सिनेमात बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि डॉ. काशिनाथ घाणेकर ही पात्रे यशस्वीरित्या साकार केली आहेत.

Subodh Bhave, Shivaji Maharaj

आता हाच सुबोध भावे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत लोकांसमोर येत आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय शौर्याने गाजलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटात तो शिवाजी महाराज साकार करीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे. अन्‌ तो चित्रपट तयार झाला आहे.

Subodh Bhave, Shivaji Maharaj

डॉ. काशिनाथ घाणेकर या चरित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत यांनीच केले होते. या चित्रपटात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा प्रवेश दाखविण्यात आला होता. त्यातील संभाजीची भूमिका सुबोधने वठविली होती. ती डोळ्यासमोर ठेवून दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी सुबोधला शिवाजीच्या रूपात पाहिले व सादर केले आहे.