पांढरे शुभ्र ड्रेस घालून ‘हॉट’ कसे ...

पांढरे शुभ्र ड्रेस घालून ‘हॉट’ कसे दिसावे; हे निया शर्माकडून शिकण्यासारखे आहे : बघा तिचे उन्मादक फोटो आणि उत्तेजक ड्रेस स्टाईल्स (Style Alert: Nia Sharma’s Love For White… Actress Knows How To Style White Outfits…See Stunning Pictures)

निया शर्मा ही अतिशय फॅशन वेडी आहे… तिचे ड्रेस , स्टाईल, मेकअप, हेअर स्टाईल्स् या खूपच वेगळ्या असतात. आपले लूक्स आणि स्टाईलवर ती जगावेगळे प्रयोग करत असते.

झलक दिखला जा कार्यक्रमामुळे निया शर्मा अलिक़डे चर्चेत आहे. डान्सच्या या रंगमंचावर ती आपले कौशल्य दाखविण्यासाठी अगदी तयार आहे.

आपल्या लूक्सवरुन निया अनेकदा ट्रोल होत असते. कारण ती कायमच या संदर्भात एक पाऊल पुढेच असते. तिला ट्रेंड सेटर म्हणायला हरकत नाही.

वेस्टर्न आणि भारतीय अशा दोन्ही स्टाईल्स ती उत्कृष्टरित्या सादर करते. जवळपास प्रत्येकच पेहरावात ती उन्मादक दिसते. अन् नेटकऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात.

पांढरे शुभ्र ड्रेसेस तिला आवडतात. पांढरा रंग हा तसं पाहिलं तर थंड प्रवृत्तीचा आहे. पण याच पांढऱ्या रंगाला निया अतिशय हॉट बनवून टाकते.

निया शर्माचे पांढऱ्या रंगावरील प्रेम कसे बहरुन आले आहे ते पुढील फोटोंमध्ये बघा. अन् या थंड प्रवृत्तीच्या रंगामध्ये हॉट कसे दिसता येते ते तिच्याकडून शिकण्याजोगे आहे.