सचिन तेंडुलकरची लेक साराचे मॉडेलिंगच्या जगतात प...
सचिन तेंडुलकरची लेक साराचे मॉडेलिंगच्या जगतात पदार्पण, साराचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचं होतंय कौतुक (Stunning: Sachin Tendulkar’s Beautiful Daughter Sara Makes Her Modelling Debut)

सचिन तेंडुलकरची लेक सारा सोशल मीडियावर बरीच सक्रीय आणि लोकप्रिय आहे. सारा नेहमी तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो मीडियावर शेअर करत असते. तिचे सौंदर्य कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, तिने चित्रपटांत आले पाहिजे, असे तिच्या चाहत्यांना वाटते. साराने तिच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे, तिने या झगमगत्या दुनियेत आपले पहिले पाऊल ठेवले आहे.

साराने नुकतेच मॉडेलिंगमध्ये डेब्यू केले आहे. ती एका ॲड फिल्ममध्ये दिसू लागली आहे. एका सुप्रसिद्ध फॅशन ब्रँडसाठी साराने तान्या श्रॉफ आणि बनिता संधूसोबत ही ॲड फिल्म केली आहे. या फिल्ममध्ये तिघीही अतिशय ग्लॅमरस दिसल्या आहेत.


या जाहिरातीत साराचा आत्मविश्वास आणि तिचं सौंदर्य कौतुकास्पद आहे. साराच्या फॅशन सेन्सची लोक नेहमीच प्रशंसा करत असतात. त्यांना साराची ही जाहीरात खूपच आवडत आहे. साराने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर ही शेअर केली आहे.

ttps://www.instagram.com/reel/CXJAxrnhUU2/?utm_medium=copy_link
साराने लंडनमध्ये तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. क्रिकेटर शुभम गिलसोबत नेहमीच तिचे नाव जोडले गेले आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचेही म्हटले जात आहे. असो. सध्या लोक तिचे ग्लॅमरस जगतात स्वागत करत आहेत