उन्हाळ्यावर मात करण्यासाठी स्विमींग पूलमध्ये डु...

उन्हाळ्यावर मात करण्यासाठी स्विमींग पूलमध्ये डुबक्या मारणाऱ्या अभिनेत्री (Stunning Pictures Of Bollywood Actresses Chilling In The Pool)

उन्हाळा ऐन भरात आहे. तशातच ही काहिली सुसह्य करण्यासाठी कित्येक बॉलिवूड अभिनेत्री स्विमींग पूलमध्ये डुबक्या मारण्याचा आनंद घेतात. पोहताना त्या मौजमस्ती करतात. अन्‌ आपले सेक्सी फोटो सोशल मीडियावर टाकतात, जे ताबडतोब व्हायरल होतात. पोहण्याचा आणि पोहतानाचे आपले सेक्सी फोटो प्रसिद्ध करण्याचा छंद असणाऱ्या या अभिनेत्री आहेत.

दिशा पटणी

‘बेफिक्रा’ या व्हिडिओ सॉन्गमधून प्रकाशात आलेल्या दिशा पटणीला पाण्यात पोहण्याचा भारीच छंद आहे. कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून ती गरमीवर मात करण्यासाठी स्विमींग पूलमध्ये मस्ती करते. पाण्यात आणि पाण्याबाहेर देखील ती इतक्या हॉट आणि सेक्सी पोझेस्‌ फोटोसाठी देते की, ते पाहून चाहते बेकाबू होतात.

सारा अली खान

श्रीमंतीत वाढलेली सारा अली खान पोहण्याचा आनंद मनमुराद घेते. त्यासाठी तिची आवडती जागा आहे मालदीव बेट. अलिकडेच ती कुटुंबकबिल्यासह मालदीवला पोहचली. अन्‌ तिथे स्विमींग पूलमध्ये गारवा घेत, एकापेक्षा एक मादक पोझेस्‌ देऊन फोटो काढून घेतले. बघता बघता हे फोटो चांगलेच व्हायरल झाले.

मलायका अरोरा

चांगली फिगर राखलेली, अन्‌ प्रेमप्रकरणांत गाजलेली मलायका अरोरा अलिकडेच, आपला मित्र अर्जुन कपूर बरोबर गोव्याला गेली होती. तेथील हॉटेलातील पोहण्याच्या तलावात डुंबत तिने हॉट पोझेस्‌ दिल्या. तिचे हे गरमागरम फोटो अर्जुन कपूरनेच काढले होते.

मलायकाचे हे हॉट फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. चाहत्यांनी त्यावर बरेच लाइक्स व कमेंट्‌स दिले.

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राला स्विमींग पूलचा थंडावा अनुभवायला खूपच आवडते. ती बहुतेक करून अमेरिकेत असते. तिकडे लॉस एंजल्सच्या पूलमध्ये हा थंडावा घेत असलेले आपले फोटो शेअर करत असते. तिच्या या हॉट छायाचित्रांनी इंटरनेटचे तापमान वाढायला वेळ लागत नाही.

तापसी पन्नू

तापसी पन्नूने बिकिनी घालून, स्विमींग पूलमध्ये थोडा वेगळेपणा दाखवला. ट्रे मध्ये ठेवलेला ब्रेकफास्ट खाताना तिने आपले फोटो सोशल मीडियावर टाकले. ते काही मिनिटातच व्हायरल झाले.

कृती सॅनन

उन्हाळ्याचा तडाखा सुसह्य करण्यासाठी कृती सॅनन गेल्या वर्षी मालदीवला गेली होती. गर्द निळा स्विमींग सूट घालून तिने पाण्यात डुबक्या घेतल्या. पाण्यातून थंडावा मिळविण्यासाठी तिने केलेली ही धडपड सोशल मीडियावर शेअर केली.

मौनी रॉय

मौनी रॉयला समुद्रकिनारी बागडायला खूप आवडते. म्हणूनच फुरसत मिळताच ती बीचवर जाते. अलिकडेच ती सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेली. तिथे लाल जर्द स्विमींग सुटात तिने समुद्रस्नानाचा आनंद लुटला. अन्‌ तिच्या ग्लॅमरस्‌ फोटोंचा चाहत्यांनी आनंद घेतला.

सनी लिओनी

अतिशय हॉट आणि सेक्सी सनी लिओनीला स्विमींग पूलमध्ये बागडायला खूप आवडते. पाण्यात राहून, स्विमसूटमधले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. ते व्हायरल व्हायला वेळ लागत नाही.