पाठ उघडी टाकणारे उन्मादक ब्...

पाठ उघडी टाकणारे उन्मादक ब्लाऊज घालून साडीला सेक्सी लूक देणारी कलावती (Stunning Avatar Of Actress In Sexy Backless Blouse And Saree)

बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये एक अभिनेत्री खूप गाजली होती. बऱ्याच सिरियल्समधून तिनं आपली अदाकारी गाजवली आहे. ती आहे पवित्रा पुनिया. ती मुळातच दिसायला सेक्सी आहे. आपलं अंगप्रदर्शन ती बोल्डपणे करते. काही महिन्यांपूर्वी तिनं अंगप्रदर्शक फॅशन केली होती, सोशल मीडियावरील तिचे पाठीराखे ती, अद्याप विसरू शकलेले नाहीत.

बॅकलेस अर्थात्‌ पाठ उघडी टाकणारे ब्लाऊज, अंगाला घट्ट बसणाऱ्या साडीवर घालून तिने अतिशय उन्मादक फोटो प्रसिद्ध केले होते. अन्‌ साडीला सेक्सी लूक दिले होते.

पवित्राचं खरं नाव आहे नेहा सिंह. पण ती प्रसिद्ध झाली पडद्यावरील नावाने. तिने बऱ्याच मालिकांमधून कामे केली आहेत. स्प्लीटस्‌ व्हिला ३ या वेब सिरीज्‌मध्ये ती होती.

नेहा उत्तर प्रदेशातील आहे. आता तिचे वय ३४ असून तिचं शिक्षण दिल्लीत झालं आहे. तिला पोलीस अधिकारी व्हायचं होतं. त्यासाठी तिने दीड वर्षे प्रशिक्षण देखील घेतलं. पण अखेरीस या मनोरंजन क्षेत्रात आपला जम बसवला.

पवित्राने ‘स्प्लीटस्‌ व्हिला’ मध्ये पदार्पण केलं आणि गीत हुई सबसे पराई व लव्ह यू जिंदगी मालिकेतून कामे केली.

अंगाला घट्ट बसणाऱ्या साडीला सेक्सी लूक देण्यात व बॅकलेस ब्लाऊज घालून आपली उघडी पाठ व त्या पाठीवरील लांबडा टॅटू दाखवण्याबद्दल ती प्रख्यात आहे.

बॅकलेस ब्लाऊजचे अफलातून प्रकार आणि साडीच्या वेगवेगळ्या स्टाईल्सने ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते.

पवित्रा पुनियाने ‘डायन’ आणि ‘नागिन’ या थरारक, चमत्कारीक मालिकांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत.