चुरमुरे, शेंगदाणे आणि चर्चा (Short Story: Churm...
चुरमुरे, शेंगदाणे आणि चर्चा (Short Story: Churmure Shengdane Ani Charcha)

चुरमुरे, शेंगदाणे आणि चर्चा
छोट्या गावांमध्ये शक्यतो एक दिवसाची वा फिरायला जायची, आपण ज्याला picnic म्हणू अशी एक जागा हमखास असते . नदीकाठी, माळावर (शेतात),कधी एखाद्या जुन्या मंदिराच्या पायथ्याशी. इथंच सगळी आप्तेष्ट वा मित्रमंडळी एकत्र जमतात. गप्पा टप्पा रंगतात आणि कधी काहीशी चर्चासत्रही रंगतात . मग फार काही नाही तर चणे, शेंगदाणे, चुरमुरे असं सुकं खाण घेऊन अशा छान वाऱ्याच्या शांत ठिकाणी सगळे थोडा निवांत वेळ घालवतात . यात चर्चेचा विषय ,हा असा काही गहन वगैरे नसतो. पण घडलेल्या गोष्टी, कधी गाणी ,कधी कुरबुरी ,कधी एकमेकांच्या बातम्या ,कधी दुखणी खुपणी अशा अनेक गोष्टी share होतात . सहज बोलता बोलता माणसं मनं मोकळी करतात .
भावना हि एक अशी गोष्ट आहे कि तिचा योग्य निचरा होणं फार महत्वाचं असतं. यात काही मोठ तत्वज्ञान असं नाही. पण सहसा पाणी वाहतं असलं तरच त्यातला गढूळपणा नाहीसा होतो . ते जर तुंबलं किंवा साठलं तर मात्र ते त्रासदायक, दूषित होतं . माणसाच्या मनाचं, भावनांचंहि हे असच असतं . मन जितकं मोकळं तितकं आपल्याला पॉझीटीव्ह वाटतं.
कुणासाठी ते वाचणं असू शकतं, कुणासाठी मैत्रिणीशी फोन वर मारलेल्या गप्पा ,कधी मॉर्निंग/इव्हनिंग वॉक,तर कुणासाठी अगदी शांत निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निवांत बसणं असू शकतं . आपली वाट आपणच शोधायला हवी . पैसे खर्च करून समाधान विकत घेता येत नाही . समाधान आतून अनुभवायचं असतं .शहरांमध्ये राहताना आपल्याला काहीतरी सतत Chase करायची ,म्हणजे घाईची ,अस्थीरतेची सवय लागते . पण या सगळ्याला जी विरामचिन्ह लागतात मग ते स्वल्पविराम किंवा पूर्णविराम आपण देतच नाही . जरी अशा जागी इतर गोष्टी शक्य नसल्या तरी विरंगुळा ,मित्र आणि निसर्ग यात तरी आपण आपलं मन रमवू शकतो . कुठल्याही गोष्टीत डागडुजी केली कि गाडी पुन्हा भरधाव धावू लागते . गरज असते ती फक्त त्या एका short -pause ची . मग तो मोठ्या कॅफेतला कॉफी ब्रेक असो कि मित्राबरोबर चा cutting चहा.
-मुग्धा सावळे😊