आई, मला क्षमा कर (Short Story: Aee Mala Shama Kar)

आई, मला क्षमा कर (Short Story: Aee Mala Shama Kar)

आई, मला क्षमा कर


– शं. रा. पेंडसे

लहानपणी मला शाळेत ठेवून आई घरी जायची तेव्हा मी जोरजोराने रडत ओरडायची, ङ्गआई, नको गं जाऊ.फ तेव्हा आई माझं सर्वस्व होती. आज चित्र बदललं होतं. माझ्या ठिकाणी माझी आई होती.
ज सकाळपासूनच आईला आणि मला अगदी गलबलून येत होतं. आज सकाळी अकराच्या फ्लाईटने आई माझ्या घरून भारतात परत जाणार होती. चार वर्षांपासून मी आणि माझा पती सुरेश न्यूयॉर्कमध्ये राहात होतो. वडिलांना हृदयविकाराचा त्रास असल्याने गेल्या तीन वर्षांत आईला अमेरिकेत येणं शक्य नव्हतं. पण वडील गेले आणि आई कोलमडून गेली. त्या परिस्थितीत आईला दु:खाचा विसर पडावा म्हणून मी तिला माझ्या घरी अमेरिकेत घेऊन आले.
आईला या वातावरणात दु:खाचा विसर पडला पण या अमेरिकन जीवनाला आई दोन महिन्यांतच कंटाळली.
मस्वाती, माझ्यासारखीला इथं आणखी दिवस काढणं कठीण आहे बाई.फ आई एक दिवस मला म्हणाली.
ङ्गएवढ्यात कंटाळलीस? अगं कसं छान वातावरण आहे इथं. गडबड नाही, गोंधळ नाही, कर्णकर्कश आवाज नाहीत, शेजार्‍यापाजार्‍यांचा त्रास नाही….फ मी म्हणाले.
आईसारख्या समाजात मिळून मिसळून वागणार्‍या बाईला अमेरिकेतलं हे जीवन म्हणजे बंदिवासच होता. शेजार तसा नव्हताच. बंगल्याच्या आवारातून बाहेर पडून शेजार्‍यांकडे जावं लागे. एका बाजूला चिनी कुटुंब तर दुसर्‍या बाजूला मेक्सिकन कुटुंब राहात होते. आमची सुद्धा ङ्गहायफ म्हणण्याइतकीच त्यांची ओळख! त्यामुळे शनिवार वा रविवारच्या सुट्टीत आईला आम्ही बाहेर नेत असू, तेवढाच तिचा विरंगुळा होत होता. बाकी आठवड्याचे पाच दिवस आम्ही दोघं इतके व्यस्त होतो, की काही वेळेला फक्त आईची विचारपूस करण्याइतकीच उसंत मिळे.
आईने त्यामुळेच भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता आणि नाईलाजाने आम्हालाही त्याला मान्यता द्यावी लागली.
जसाजसा जायचा दिवस जवळ येऊ लागला, तशी माझ्या जीवाची तगमग वाढली. आज गेले दोन महिने, घरी आले की दार उघडून आई हसतमुखाने स्वागत करी. कोचावर बसले की लगबगीने घरात जाऊन प्रथम पाण्याचा ग्लास माझ्यापुढे करी. मुंबईला असताना शाळेतून किंवा कॉलेजातून घरी आले की अगदी असंच स्वागत आई करीत असे. हात-पाय धुवून टेबलापाशी जावं तर गरमगरम शिरा, पोहे तर कधी थालीपीठ तयार असे. उद्यापासून हे थांबणार होतं… आल्याआल्या मलाच घर उघडून आत यावं लागणार होतं. हात-पाय धुवून फ्रीजमधून कोक वा ज्युस तोंडाला लावावा लागणार होता.
आईची तब्येतही आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. रक्तदाब आणि मधुमेह हे रोग आईचे शरीर पोखरत होते. तरीही चेहर्‍यावरचं हास्य आणि अंगातला उत्साह कायम होता.
आईकडे पाहता पाहता मी म्हटलं, ङ्गपहिल्यांदा शाळेत घातलंस तेव्हा मी काय रडायची! तुझा पदर जाम सोडीत नसे. आई तू नको जाऊस… नको जाऊस… म्हणून आक्रोश करायचे. पण शेवटी घट्ट मन करून तू मला शाळेच्या मावशीकडे सोपवायचीस आणि लगबगीनं मागे वळूनही न बघता घरी परत यायचीस. मला आठवतं तेव्हाही तुझे डोळे अश्रुंनी डबडबून यायचे!फ
त्या आठवणींने आमच्या दोघींचे डोळे अश्रुंनी डबडबले. ङ्गकिती छान दिवस होते ना तेफ, मी म्हटलं. ङ्गहो, गं माझ्या छकुलेफ, आईने मला जवळ घेत म्हटलं.
***
एअरपोर्टवर आईला सोडताना सुद्धा माझी अगदी अशीच अवस्था झाली होती. सामानाच्या बॅगा ढकलीत आई आत गेली. तेव्हा माझ्याही हृदयाचा बांध फुटला. ङ्गआई, तू नको जाऊस… आई, तू नको जाऊस…फ, मी जोराने ओरडले. माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. सुरेशने लगेच मला जवळ ओढले.ङ्घस्वाती, अगं काय हा वेडेपणा… आई येईल परत.फ
मी सुरेशला म्हणलं,ङ्घ सुरेश… आई आपल्याकडे नक्की येईल ना परत…मला एकटं एकटं वाटेल हो…फ
सुरेशने माझी कशीबशी समजूत काढली कारमध्ये. एअरपोर्टवरून परतताना मी शाळेत जाताना कशी रडायचे, तो किस्सा मी सुरेशला सांगितला. आईला सोडलं तेव्हा अगदी तस्स वाटलं… अमेरिकेच्या या बंदिशाळेत आई मला एकटीला सोडून गेली आहे, असं वाटत राहिलं. सुरेश माझा हात थोपटत राहिले.
***
आमचं अमेरिकेतलं जीवन यांत्रिकपणे सुरू झालं. दोन-चार दिवस घर ओकंबोकं वाटलं, मग मात्र ते अंगवळणी पडलं. आईला आठवड्यातून एकदा मी फोन करीत असे. आईने पण मुंबईतल्या आपल्या जीवनात जमवून घेतलं.
***
दोन वर्षांनी आम्ही तीन आठवड्यांची सुट्टी घेऊन भारतात येण्याचा बेत केला. माझं सासर पुण्याचं. त्यामुळे पुण्याला मुक्काम असेच. आठ-दहा दिवस एकटीच मी मालाडला आईकडे येऊन राहणार होते. तसं आईला कळवलंही होतं.
यथावकाश आम्ही भारतात आलो आणि पुण्याचा पाहुणचार संपवून मी एकटीच आठ-दहा दिवसांसाठी आईकडे मुक्कामाला आले. सुरेश मला सोडायला आले आणि दुसर्‍या दिवशी पुण्याला गेले.
***


आई घरी एकटीच. मी एकुलती एक मुलगी… त्याचवेळी आईबाबांचा मला फार राग आला. ङ्गअहो माझ्या पाठी बहीण वा भाऊ जन्माला घातला असता तर बिघडलं असतं का? आज आईच्या जवळ रक्ताच्या नात्याचं कुणीतरी माणूस उभं राहिलं असतं… काळजी घेणारं…
आईला सुद्धा सख्खा भाऊ एकच. तो सुद्धा नोकरीनिमित्त बडोद्याला राहात होता. बाबासुद्धा एकुलते एक. ना भाऊ ना बहीण. म्हणजे नातेवाईक माणसांचा तुटवडा…
ङ्गस्वाती चांगली मुंबईत राहिली असतीस ना तर दररोज नाही तर आठवड्यातून एकदा तरी आईला भेटायला येता आलं असतं…पण हे अमेरिकेचं खूळ…फ आईने नेहमीचा विषय काढला.
ङ्गआई अगं हे खूळ नाही. माणसाच्या कर्तृत्वाला आज जगात सर्वत्र फार मोठ्या संधी आहेतफ, मी समजावण्याच्या सुरात म्हटलं.
ङ्गअगं आपल्या देशात काय कमी नोकर्‍या आहेत?फ आईचा प्रश्‍न.
मी आईला समजावीत म्हणाले, ङ्गआई, सुरेशने, माझ्या नवर्‍याने जे यश अमेरिकेत मिळवलं आहे ना, ते भारतात पुढचे दहा वर्षे नोकरी करूनही त्याला मिळालं नसतं…फ
शेवटी विषय परतीचा निघाला.
आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती, हे मला दिसत होतं. तिने मदतीकरता एक मुलगी ठेवली होती. तीच स्वयंपाकपाणी करी. आईला हवं नको ते बघे. मामाने मुद्दाम कोकणातून नात्यातल्याच या मुलीचा आधार म्हणून आईकडे ठेवलं होतं. मुंबईत राहणारा मामाचा मुलगा अधूनमधून आईची चौकशी करून जाई.
माझ्या मुंबईच्या मुक्कामात आईची ही खंत दररोज मला जाणवत असे. मुंबईच्या मुक्कामात माझ्या मैत्रिणी भेटल्या. विनिता खरे माझ्याबरोबरच मालाडच्या शाळेत होती. कॉलेजमध्येही दोन वर्षे आम्ही बरोबर होतो. तिने बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली. तर मी कॉम्प्युटर सायन्समध्ये. तिचं लग्न होऊन तिच्या नवर्‍याने मालाडमध्येच ब्लॉक घेतल्याने तिचं सासर माहेर एकाच गावात आलं. नेहा आगरकर लग्न होऊन बोरीवलीला राहायला गेली. मालाड-बोरीवली अंतर तसं कमी. आठ दिवसांनी आईकडे एक फेरा असतोच. मालाडचीच तिची मैत्रीण विभा. लग्न होऊन गेली पुण्याला. बँकेतल्या नोकरीची पुण्याला ट्रान्सफर करून सुद्धा घेतली. पण दोन वर्षांनी नवर्‍याने धंदा सुरू केला म्हणून मुंबईला आली. आता जागाच नवीन घ्यायची म्हणून पहिली पसंती मालाडला. आईबाबांच्या जवळ!
आई ही सगळी उदाहरणं मला परत परत द्यायची. ङ्गबघ या तुझ्या मैत्रिणी कशा आईबाबांचं ऋण फेडताहेत. म्हातारपणी त्यांची विचारपूस करीत आहेत. कारण त्या इथं आहेत. तू जाऊन बसलीस सातासमुद्रा पलिकडे!फ
मी खरं म्हणजे जाणूनबुजून अमेरिकेत राहणार्‍या तरुणाशी लग्न केलं नव्हतं. टी.सी.एस. कंपनीत सुरेश आणि मी एकत्र काम करीत असताना आमचं प्रेम जमलं होतं. लग्नानंतर आम्ही मुंबईमध्ये जागाही घेतली होती. तेवढ्यात सुरेशला कंपनीने मुंबईला पाठवलं. ते होतं फक्त एक वर्षांकरिता. आमचं नुकतंच लग्न झालेलं असल्याने कंपनीने दोन महिन्यांनी मला सुद्धा त्याच ठिकाणी अमेरिकेला पाठवलं आणि एक वर्षाच्या बोलीने आम्ही अमेरिकेत आलो.
एक वर्षांचा कालावधी दोन वर्षांचा झाला. दोन वर्षांनी परत यायच्या वेळी सुरेशला अमेरिकेत जी.ई.सी. कंपनीकडून चांगली ऑफर आली. त्याने ती संधी घेण्याचे ठरविले. दोन वर्षांनी सर्वांना भेटायला म्हणून मुंबईला आलो आणि दोघांनी टी.सी.एस. कंपनीचा राजीनामा दिला. अमेरिकेला गेलो ते जी.ई.सी.च्या नोकरीकरिता.
***
नवीन कंपनीत सुरेशचा चांगलाच जम बसला. चार वर्षांत तो कंपनीचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झाला. मलाही त्याच कंपनीत नोकरी मिळाली. त्या तीन-चार वर्षांत आई-बाबा चांगले हिंडते-फिरते होते. बाबांना जावयाचा-सुरेशचा अभिमान होता. ङ्गमाझ्या स्वातीचं सिलेक्शन योग्यच असणार याची मला खात्री आहेफ, असं ते मला नेहमी म्हणायचे.
हे सारं मला आठवत होतं कारण माझ्यामागे आईचा एकच हेका होता. ङ्गकसंही कर पण सुरेशचं मन वळव. तुम्ही दोघंही भारतात परत या.फ
पण सुरेश भारतात परत येण्याच्या विरोधात होता. पुढची दहा वर्षे तरी भारतात परत येण्याचा तो विचार सुद्धा करू शकत नव्हता. अशा वेळी तो म्हणे ङ्गस्वाती, तुला भारतात जाण्याची इच्छा असेल तर तू जाऊ शकतेस.फ
अशा वेळी आई मला सांगत होती,
मस्वाती तू सुरेशला ठणकावून सांग, हे बघा आपलं हे अमेरिका पुरे झालं. आपण दोघंही भारतात परतूया. पण तुमचा येथे राहण्याचा निश्‍चयच असेल तर ही मी चालले भारतात परत. असं सांगितलं की झक्कत तो परत येतो की नाही ते बघ.फ या दबावाला सुरेश बळी पडेल हा आईचा भ्रम होता!
या सार्‍या प्रकरणात माझी मात्र कोंडी झाली होती. माझी द्विधा मन:स्थिती झाली होती. आईचं प्रेम सारखं मला माझ्या मायभूमीकडे खेचत होतं. तर सुरेशच्या प्रेमाचे धागे मला अमेरिकेकडे ओढत होते.
***
मुंबईतील आठ दिवस भुर्रकन उडून गेले. शेवटी अमेरिकेला परत जाण्याचा दिवस आला. आदल्या दिवशी सुरेश सारं सामान घेऊन मालाडला आला होता.
केव्हा तरी ती वेळ येणारच होती! आईच्या ताटातुटीची. आमच्या प्रस्थानाची.
सारा दिवस आईच्या डोळ्यांतील पाणी ठरत नव्हतं. आई धड जेवलीही नाही. मी सुद्धा कसेबसे दोन घास पोटात घातले. सुरेशनं जेवल्यासारखं केलं इतकंच.
टॅक्सी आली आणि सुरेश बॅगा घेऊन टॅक्सीत ठेवायला गेले. त्याचवेळी आईने जोराने हंबरडाच फोडला. ङ्गस्वाती, मला सोडून जाऊ नको गं पोरी…फ
मी आईला जवळ घेऊन शांत केलं. मला आठवतं लहानपणी मला शाळेत ठेवून आई घरी जायची तेव्हा मी जोरजोराने रडत ओरडायची ङ्गआई, नको गं जाऊ! आई, जाऊ नको… जाऊ नको…फ तेव्हा आई माझं सर्वस्व होती.
आज चित्र बदललं होतं. माझ्या ठिकाणी माझी आई होती. जोरजोरानं ओरडत ती मला सांगत होती. ङ्गपोरी नको गं जाऊस मला सोडून.फ
पण आईचे हे बंध मला तोडावे लागत होते. आईच्या पावलांना स्पर्श करीत मी म्हटलं, ङ्गआई, मला क्षमा कर. माझा नाईलाज आहे.फ
जड पावलांनी मी घरून निघाले. लहानपणी शाळेत सोडताना आईला मी म्हणायचे, ङ्गआई लवकर ये..फ आज डबडबलेल्या डोळ्यांनी आई म्हणत होती, ङ्ग स्वाती, पोरी लवकर परत ये… लवकर ये.