आयुष्य (Short Story: Aayushya)

आयुष्य (Short Story: Aayushya)

आयुष्य

आयुष्य, Short Story, Aayushya
– प्रमोद कांदळगावकर
समोरच्याला तुमचे आयुष्य बाहेरून फुलपाखरासारखे दिसत असेल परंतु आतमध्ये तुमचं मन बाहेरच्या ताणतणावापासून स्वतःचा बचाव करण्याकरिता जाळ उगवत असत. याकडे वेळीच अंतर्मनातून सकारात्मकतेने बघणे आवश्यक आहे. नाही तर अंताकडे वाटचाल अटळ आहे.

’आयुष्य’ म्हणजे जीवन असा सरळ साधा अर्थ पण त्या शब्दात सुद्धा जीवनाचे रहस्य दडलेले आहे. मानवाचे, पशुपक्षांचे जीवन यात भिन्नता निश्चितपणे ओतप्रोत भरलेली आहे. प्रत्येकांच्या जीवनात दिवसागणिक परिस्थितीनुसार जीवनाच्या तत्वज्ञानाची मांडणी केली गेली आहे. त्यात याचा दृष्टिकोन दिसून येतो आणि आपले आपणच मूल्यमापन करतो. दैनंदिन जीवनातील समस्यांना आपले आपणच सामोरे जातो. किंबहुना सामोरे जावे लागतं . त्याक्षणी मुखातून उमटणारा शब्द म्हणजे आयुष्य!
जगतात कोट्यावधी माणसं आणि पशुपक्षी हे आपल्यापरीने जीवनाचे रहाटगाडगे वाहत असतो. प्रसंगी निसर्ग निर्मित, मानवी चुकांमुळे आपत्ती येत असतात आणि येथून आपण जीवनाला पर्यायाने आयुष्याला दोष देण्यास तयार होतो. तेवढ्यात तुमच्याविषयी सहानुभूती असलेली व्यक्ती, मित्र, सखा, शेजारी, आप्तेष्ट धीर देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातून काही मौलिक सल्ले दिले जातात. अर्थात त्यामध्ये काहींच्या ज्ञानाची, अनुभवाची त्यात शिदोरी दिसून येते पण त्याने आपलं समाधान होते का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. कोणत्याही प्रसंग अथवा समस्या यासाठी स्वतःला स्थिर आणि खंबीरपणे सामना करावा लागतो हे सत्य आहे. त्याला विसरून कसे चालेल? हे प्रत्येकाने विचारात घ्यायला हवे आणि त्यानुसार वाटचाल करून कृतिभय जीवन ज्याला त्याला वागावे लागते. तरच आपणास दिलेल्या हितचिंतकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन फलदायी ठरू शकेल. वस्तुतः असे होत नाही.

आयुष्य, Short Story, Aayushya
दुःखाला आपण कवटाळतो ! उदाहरणार्थ नवर्‍याच्या अगोदर बायकोचे निधन झालं. आता माझे कसे होणार? असा प्रश्न प्रत्येक मानवाच्या आयुष्यातील यक्षप्रश्न बनला आहे? प्रत्येकाला माहित आहे की, जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस मला या जगाचा निरोप घ्याचा आहे. मग आपल्या मनाची तयारी का बरे होत नाही?
जगण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. जीवन जगत असताना जीवनाविषयक संकल्पना आणि अपेक्षा मोठ्या आहेत. याचाच मानवी वृत्तीला त्रास होत असतो. अपेक्षेच्या ओझ्याखाली, संकल्पनांच्या इच्छेप्रमाणे त्या पूर्ण होत नसतात. त्या पूर्ण करण्यासाठी परिणाम दिसू लागतात. त्यातच आपलं मानसीक संतुलन बिघडते आणि शरीराची हानी होते. अशावेळी डॉक्टरी सल्ल्यापेक्षा बुवा, बाबा यांच्या नादी लागल्याचे पाहण्यास मिळत. यातच आपलं आयुष्य पणाला लावण्याचा प्रयत्न होतो. मग त्यावेळी आपल्यातील विवेक, क्षमता पूर्णपणे गळून पडते. त्यावेळी जन्माला आल्यानंतर जे संस्कार करण्यात आले होते. तेही गळून पडलेले असतात. आपल्याच मनावरचा ताबा राहत नाही. काय करून बसलो? यावर विचार करीपर्यंत खोलात पाय गेलेला असतो. त्यावेळची अवस्था कोळिष्टकांप्रमाणे झालेली असते. ज्यांनी तुम्हाला आयुष्याविषयी कथा आणि व्यथा सांगितली होती. ते सुद्धा तुमच्यापासून लांब दूर निघून जातात. त्यावेळी वाटतं माझ्यावर एवढा प्रसंग ओढवला. त्यावेळी माझापाशी येऊन कुणी ख्याली खुशाली घेतली नाही. प्रत्येकाला आपल्याच आयुष्याचे गणित सोडवताना नाकात दम येत असेल तर तो तरी कशाला यात लक्ष घालील? हा सुद्धा विचारात घेण्यासारखा प्रश्न आहे. माणूस म्हटला की , कमी जास्त प्रमाणात स्वार्थ आला. या स्वार्थापायी मानवाने मानवाच्या आयुष्यात दुःख देण्याचे काम केले. मग त्यात कित्येक वर्षांची मैत्री असेल. त्याच्याकरिता तुम्ही तुमच्या जीवनाचा भाग असाल पण तो क्षणार्धात तुम्ही केलेले उपकार विसरला. तर तोही तुमच्या आयुष्याचा अडसर ठरू शकतो. त्या वेदना म्हणजे सहन होत नाही सांगताही येत नाही. अशी अवस्था होते. सभा, समारंभातून सातत्याने सांगितले जाते. तसेच शासकीय आस्थापना, अथवा खासगी ठिकाणी काम करीत असाल तर सेवापूर्तीच्या समारंभात आवर्जून वाक्य मुखी येतं की आयुष्य खूप सुंदर आहे!
खरंच आयुष्य सुंदर असण्याचे कारण नसावे. एवढं तारतम्य आपल्यात नाहीत. संत, महंत नेहमी सांगत असतात. तुम्ही जगा दुसर्‍याला जगवा! मात्र प्रत्यक्षात असे वागतो का? याचे ज्याने त्याने आत्मपरीक्षण करावे ! आयुष्याबद्दल साहित्यिक, अध्यात्मिक गुरु तत्वज्ञानी यांनी सांगितले आहे. त्यांचे पालन कृतीत आणून वागण्याचा प्रयत्न करू तोच आयुष्य सुदिन असेल! याच तीन अक्षरी शब्दात सौख्य सामावले निश्चित! त्याहीपेक्षा पेराल तिथं उगवत हेच खरे.