अभिनेत्री देबीना बॅनर्जीची श्रीलंकेहून परत आल्य...

अभिनेत्री देबीना बॅनर्जीची श्रीलंकेहून परत आल्यापासून लागली वाट! दोन्ही तान्ह्या लेकींपासून राहावे लागतेय दूर(‘Staying Away From My Babies Now… Motherhood Is Anything But Easy…’ Writes Debina Bonnerjee As She Tests Positive For Influenza B virus)

देबीना बॅनर्जी अलीकडेच पती गुरमीत चौधरी आणि दोन्ही मुली- लियाना आणि दिविशासोबत श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होती. श्रीलंकेला अभिनेत्रीने लग्नाचा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन डे साजरा केला. सोबतच तिच्या लाडक्या लेकींची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय सहल असल्यामुळे ती खूप उत्साहित होती.

 देबीना आपल्या कुटुंबासोबत भारतात परतली आहे, पण इथे आल्यावर तिची अवस्था इतकी वाईट झाली आहे की नाईलास्तव तिला आपल्या दोन्ही मुलींपासून वेगळे राहावे लागले आहे. अभिनेत्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि सांगितले की तिला इन्फ्लुएंझा बी व्हायरस झाला आहे. यामुळे तिला तिच्या मुलींपासून दूर राहावे लागत आहे.

तिने इन्स्टा स्टोरीवर अहवाल शेअर केला आहे की त्यात तिला इन्फ्लुएंझा बी ची लागण झाल्याचे दिसते, इतर सर्व गोष्टींची देखील चाचणी करण्यात आली आहे तसेच आता ती सुरक्षित आहे.

देबीनाने असेही लिहिले की, तिला तिच्या मुलांपासून दूर राहावे लागते, मातृत्व अजिबात सोपे नसते. पुढे, तिने आजाराची लक्षणे देखील सांगितली – ताप आणि खोकला.

तिच्या मुलींना हा संसर्ग होऊ नये, म्हणूनच ती खबरदारी घेत आहे आणि त्यांच्यापासून अंतर ठेवत आहे. सध्या तिचा पती गुरमीत मुलींची काळजी घेत आहेत.

देबीनाच्या मॅनेजरने एक निवेदन जारी केले आणि अभिनेत्रीच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल सांगितले की ती बरी होत आहे आणि पोषक अन्न खात आहे.