‘रानबाजार’ वेब सिरीजचे यश आणि अक्षय बर्दापूरकर ...

‘रानबाजार’ वेब सिरीजचे यश आणि अक्षय बर्दापूरकर यांचा वाढदिवस, असा दुहेरी आनंदसोहळा साजरा (Star Studded Twin Celebrations To Mark The Grand Success Of ‘Raan Bazar’ Web Series And Birthday Of Akshay Bardapurkar)

प्लॅनेट मराठीची वेब सिरीज ‘रानबाजार’ने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या सिरीजच्या नमनालाच म्हणजे ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले होते. तेव्हापासूनच ही सिरीज चांगलीच यशस्वी ठरणार अशी अटकळ बांधण्यात आली होती. ती खरी ठरली.

त्यामुळेच या सिरीजचे यश आणि प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर यांचा वाढदिवस असा दुहेरी आनंदसोहळा साजरा झाला. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि जयंत सावरकर यांनी ‘रानबाजार’चा केक कापला. या आनंद सोहळ्याला ‘रानबाजार’चे सर्वच कलाकार तंत्रज्ञ हजर होते. सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, मोहन आगाशे, जयंत सावरकर, माधुरी पवार हे कलाकार लक्षवेधी ठरले. तर प्राजक्ता माळी लाल गडद रंगातील ड्रेसमध्ये सगळ्यांचे आकर्षण ठरली.

दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना मकरंद अनासपुरे यांनी केक भरवला. या निर्मिती संस्थेची पुढील वेब सिरीज पानसे हेच दिग्दर्शित करतील, असा तर्क लढविला जात आहे.