‘कुमकुम भाग्य’मध्ये प्रज्ञा बनून सृ...

‘कुमकुम भाग्य’मध्ये प्रज्ञा बनून सृती झा हिने जिंकली सर्वांची मने, जाणून घ्या अभिनेत्रीशी संबंधित रंजक गोष्टी (Sriti Jha won Everyone’s Heart by Becoming Pragya in ‘Kumkum Bhagya’, Know Interesting Things About This Actress)

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्ये प्रज्ञाची भूमिका साकारून अभिनेत्री सृती झा हिने प्रेक्षकांची मने जिंकली. सृतीने आपल्या मेहनतीने टीव्ही इंडस्ट्रीत स्थान पक्के केले. ती तिच्या रील लाइफ पात्राच्या नावाने इतकी लोकप्रिय आहे की तिचे चाहते तिला प्रज्ञा या नावाने ओळखतात. सृतीच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. तसेच सोशल मीडियावरही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंगही पाहायला मिळत आहे.

सृतीचा जन्म बिहारमधील बेगुसराय येथे झाला. ‘कुमकुम भाग्य’मधील काम प्रेक्षकांना इतके आवडले की पुढे तीच तिची ओळख बनली. सृती बालपणी आपल्या आई-वडिलांसोबत कोलकाता येथे राहत होती. त्यानंतर वयाच्या 10 व्या वर्षी  ती आपल्या कुटुंबासह काठमांडू, नेपाळला राहायला गेली. तिथून तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. यानंतर तिने दिल्लीच्या व्यंकटेश्वरा कॉलेजमधून बीए पूर्ण केले.

महाविद्यालयीन दिवसांमध्ये, सृती ड्रामा सोसायटीमध्ये सहभागी झाली आणि नंतर ती तिथली अध्यक्षही बनली. दिल्लीत शिकत असताना तिची ‘धूम मचाओ धूम’साठी निवड झाली होती. ही तिची पहिलीच मालिका होती आणि इथून तिची टीव्हीवरील अभिनय कारकीर्द सुरू झाली.

‘धूम मचाओ धूम’ या मालिकेत सृतीने एका लाजाळू मुलीची भूमिका साकारली होती. तसेच ‘ज्योती’ या मालिकेतही ती मुख्य भूमिकेत दिसली होती. सध्या सृती ‘खतरों के खिलाडी 12’मध्ये दिसत आहे.  सृती झाने ‘जिया जले’, ‘शौर्य और सुहानी’, ‘बालिका वधू’, ‘रक्त संबंध’, ‘दिल से दी दुआ… सौभाग्यवती भव:’ यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

सृती एक अप्रतिम अभिनेत्री आहेच पण ती उत्तम डान्सरही आहे.  जेव्हा जेव्हा तिला आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळतो तेव्हा ती डान्स करते. याशिवाय तिला प्रवास आणि पुस्तके वाचण्याचीही आवड आहे. सृतीला कवितांचीही आवड आहे.

छोट्या पडद्यावर सृती साध्या आणि सुसंस्कृत सुनेच्या भूमिकेत दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ती खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली सृती झा अनेकदा आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आदर्श सून अशी प्रतिमा असलेल्या सृतीने काही काळापूर्वी आपले बिकिनी फोटो शेअर करून सोशल मीडियावरील वातावरण गरम केले होते.

अनेक मालिकांमध्ये दमदार अभिनय करुन सृतीने टीव्ही इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केले. ती कामाच्या बाबतीत खूपच निवडक आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांच्या ऑफर्सही नाकारल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सृती झाने ‘गुलाल’, ‘कितनी मोहब्बत है’, ‘कैसा ये इश्क है… अजब सा रिस्क है’, ‘छनछन’ आणि ‘जोधा अकबर’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या ‘कुमकुम भाग्य’साठी सृतीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. छोट्या पडद्यावरील या सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकेत प्रज्ञाची भूमिका साकारल्याबद्दल सृतीला ‘इंडियन टेलि अवॉर्ड्स’, ‘गोल्ड अवॉर्ड्स’, ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड्स’, ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म टीव्ही अवॉर्ड’ असे पुरस्कार मिळाले आहेत.