श्रीदेवीच्या ५९ व्या जयंती निमित्त जान्हवी कपूर...

श्रीदेवीच्या ५९ व्या जयंती निमित्त जान्हवी कपूरने शेअर केली भावूक पोस्ट (Sridevi’s Birth Anniversary: Daughter Janhvi Kapoor Shares An Unseen Throwback Photo, Khushi Kapoor Remembers Her Mom With Heartwarming Picture)

२०१८ मध्ये बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली निधनाने केवळ बॉलिवूडच नाही तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला होता. आज १३ ऑगस्ट श्रीदेवीचा वाढदिवस. ती आज हयात असती तर तिचा ५९ वाढदिवस आज साजरा झाला असता. श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री जान्हवी कपूरने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

जान्हवीने आपल्या आईच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये छोटी जान्हवी तिच्या आईसोबत दिसत आहे. फोटोत श्रीदेवीने जान्हवीला जवळ घेऊन पोज दिली आहे. या फोटोसाठी जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, मला तुझी रोज आठवण येते, मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन…

या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. ते देखील श्रीदेवीची आठवण काढत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. काहीजण कमेंटमध्ये जान्हवी, आईला तुझा नक्कीच अभिमान वाटत असेल असे म्हणत आहेत. काहींना फोटोतील जान्हवीची निरागसता खूप आवडली आहे.

जान्हवी कपूर देखील तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकत इंडस्ट्रीत यशाची शिखरे चढत आहे. सध्या ती वरुण धवन सोबतच्या बवाल चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

जान्हवीसोबतच श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूरने देखील आपल्या आईच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट असून त्यात श्रीदेवी आपल्या छोट्या लेकीच्या गालाचे चुंबन घेत आहे. 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईत श्रीदेवीचे निधन झाले तेव्हा ती एका लग्नाला गेली होती.