तरुण दिसण्यासाठी श्रीदेवी करायची हे काम, मुलींस...

तरुण दिसण्यासाठी श्रीदेवी करायची हे काम, मुलींसाठी उचलले हे पाऊल(Sridevi Used to Do This Thing to Look Young, Actress Took This Step for Daughters)

बॉलिवूडमधील बहुतेक अभिनेत्री वय वाढू लागले की आपले सौंदर्य टिकवण्यासाठी विविध प्रकारचे उपचार सुरु करतात. सुंदर दिसण्यासाठी अनेक अभिनेत्रींनी ब्रेस्ट, चेहऱ्याची किंवा ओठांची सर्जरीही केली आहे. पण ती त्या मान्य करत नाहीत ती गोष्ट वेगळी. दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीनेही सुंदर दिसण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया केल्याचे तिच्या मृत्यूनंतर समोर आले. एवढेच नाही तर श्रीदेवीने आपल्या मुली खुशी आणि जान्हवी कपूर या सुंदर दिसण्यासाठी त्यांच्यावरही शस्त्रक्रिया केल्या  होत्या. मिळालेल्या माहितीनुसार वाढत्या वयात सुंदर दिसण्यासाठी श्रीदेवी शस्त्रक्रियेसोबतच काही औषधेसुद्धा घ्यायची. तिने आपल्या मुलींसाठीही तसेच केले होते.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी स्वत:ला व स्वत:च्या सौंदर्याला जेवढे सांभाळत होती, त्याचप्रमाणे आपल्या मुलींनीही स्वत:ला सांभाळावे, अशी तिची इच्छा होती. ती आपल्या मुलींच्या सौंदर्याबद्दल खूप जागरूक होती, कारण तिला स्वतःप्रमाणेच आपल्या मुलींनाही अभिनेत्री बनवायचे होते.

श्रीदेवीने आपली मोठी मुलगी जान्हवी कपूरच्या नाकाची शस्त्रक्रिया करून घेतली होती. तसेच जान्हवीच्या पदार्पणापूर्वी तिने जान्हवीच्या आणखी काही शस्त्रक्रिया करुन घेतल्या होत्या. कारण जान्हवीने बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत टक्कर द्यावी अशी तिची इच्छा होती.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे जान्हवीचे जुने आणि नवीन फोटो पाहिले असता जान्हवीमध्ये झालेला फरक सहज जाणवतो. जान्हवी आता पूर्वीपेक्षा खूपच बोल्ड आणि सुंदर झाली आहे. याशिवाय श्रीदेवीने आपली छोटी मुलगी खुशी कपूरवरही शस्त्रक्रिया करुन घेतल्या होत्या. तिच्या लूकमध्येसुद्धा खूप बदल झाला आहे.

वयाच्या 50 व्या वर्षीही श्रीदेवी आपल्या सौंदर्यावर खूप लक्ष द्यायची. असे म्हटले जाते की तिने  सुमारे 29 वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या होत्या. इतकेच नाही तर मृत्यूच्या काही काळापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही सांगितले जाते. ती अनेकदा उपचारासाठी साऊथ कॅरोलिनाला जात होती.

जान्हवी आणि खुशी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास जान्हवीचा गुडलक जेरी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. याशिवाय ती लवकरच ‘मिली’, ‘बवाल’ आणि ‘मिस्टर अॅण्ड मिसेस  माही’या चित्रपटात दिसणार आहे. तर खुशी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच झोया अख्तरच्या आर्चीज चित्रपटात दिसणार आहे.