‘वाळवी’च्या खास ऑफरला उत्तम प्रतिसा...

‘वाळवी’च्या खास ऑफरला उत्तम प्रतिसाद : सकाळी 6 वाजताच खेळ लावावे लागले (Special Offer Of Valavi Gets Superb Response From Audience:Early Morning Show At 6 A.M. Opened)

झी स्टुडिओज, मधुगंधा कुलकर्णी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून दुसऱ्या आठवड्यात झी स्टुडिओजकडून प्रेक्षकांसाठी खास ऑफर देण्यात आली होती.

यात २० जानेवारी रोजी ‘वाळवी’चे तिकीट केवळ ९९ रूपयांत मिळणार होते आणि या ऑफरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी सकाळी सहाचे शोजही लावण्यात आले तर प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून अनेक थिएटरमधील शोजही वाढवले. प्रेक्षकांच्या मागणीवरून रात्री पावणे बाराचे खास शोज लावण्यात आले.

प्रेक्षकांकडून भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल झी स्टुडिओजचे बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘’ दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद समाधान देणारा आहे. आज जवळपास ‘वाळवी’चे सगळेच शोज नव्वद टक्के भरलेले होते. थिएटरचे शोजही वाढवावे लागले. इतकेच नाही तर प्रेक्षकांनी पुढच्या आठवड्यातील ॲडवान्स बुकिंगही केले आहे.’’