भोंडल्याचा खेळ मालिकेत रंगणार (Special Game Wil...

भोंडल्याचा खेळ मालिकेत रंगणार (Special Game Will Be Played Marathi Serial On The Occassion Of Navaratri)

नवरात्रीच्या उत्सवाचा जल्लोष सध्या सगळीकडेच पाहायला मिळतोय. स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेतही हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. देशमुख कुटुंबात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. सणाचं पावित्र्य जपत संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद लुटताना दिसतात. सध्या घरात तणावाचं वातावरण असलं तरी कांचन आजीने मात्र पुढाकार घेत हा नवरात्रीचा सण साजरा करण्याचं ठरवलं आहे.

Occassion Of Navaratri, Marathi Serial, भोंडल्याचा खेळ

कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते त्या दिवसापासून भोंडल्याची सुरुवात होते. भोंडला हा स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो. घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरुन छोट्या मुली व घरातल्या लेकी, सासू-सूना भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.

Occassion Of Navaratri, Marathi Serial, भोंडल्याचा खेळ

भोंडला करताना म्हटली जाणारी गाणी ही महिलांच्या आयुष्याशी निगडीत असतात.

‘ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा…’, ‘वहाते मी हादग्या परी हादगा, देव मी पूजिते सख्यांना बोलविते, हादगा देव मी पूजिते, लवंगा सुपा-या वेलदोडे करून ठेविले विडे, वहाते मी हाद्ग्यापुढे हादगा देव मी पूजिते’, ‘आला चेंडू गेला चेंडू’ अशी गाणी गात शेवटी ‘…आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला!’ याने सांगता होते.

Occassion Of Navaratri, Marathi Serial, भोंडल्याचा खेळ

भोंडला किंवा हादगा याचे कृषी संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. महिलांच्या सुफलीकरणाचा विधी म्हणून याकडे पाहिले जाते. आपल्या आवडत्या कलाकारांना भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरताना पाहताना छान वाटणार आहे. मराठी मालिकांतून आपल्या परंपरा जपण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो खरोखरच स्तृत्य आहे.