आलिशन घर आणि ऐषारामी मोटारगाड्यांचा मालक आहे दा...

आलिशन घर आणि ऐषारामी मोटारगाड्यांचा मालक आहे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास : त्याची अफाट मालमत्ता चकित करेल अशी आहे (South’s Superstar Prabhas is Owner of Luxurious House and Luxury Vehicles, Know Actor’s Net Worth)

दाक्षिणात्य सुपरस्टार्सपैकी एक असलेल्या प्रभासचे नाव जेव्हा समोर येते तेव्हा त्याच्या ‘बाहुबली’ चित्रपटाच्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. ‘बाहुबली’ चित्रपटाच्या यशामुळे प्रभास संपूर्ण भारताचा स्टार बनला आहे आणि त्याची लोकप्रियता देशातच नाही तर परदेशातही पसरली आहे. ४३ वर्षीय प्रभास अजूनही अविवाहित आहे म्हणजेच त्याने अजून लग्न केलेले नाही, पण त्याचे आयुष्य राजासारखे आहे. टॉलिवूडमधील सर्वाधिक मागणी असलेला आणि महागडा अभिनेता असलेल्या प्रभासकडे आलिशान घर आणि ऐषारामी वाहने आहेत. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेतल्यास कोणाचाही विश्वास बसणार नाही.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय असलेला प्रभास करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे. असे म्हटले जाते की प्रभास त्याच्या एका चित्रपटासाठी १५ कोटी ते ४० कोटी रुपये घेतो. त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी त्याने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, कारण मिळालेल्या माहितीनुसार त्याने या चित्रपटासाठी निर्मात्यांकडून १०० कोटी रुपये घेतले आहेत.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

या चित्रपटासाठी करोडोंची फी घेणाऱ्या प्रभास रावने ‘बाहुबली’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतरच आपली फी वाढवली. चित्रपटांव्यतिरिक्त, तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही मोठी कमाई करतो. तेलुगु चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा प्रभास आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार बनला आहे. त्याच्या एकूण मालमत्तेबद्दल बोलायचे तर तो २१५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

प्रभास खूप विलासी जीवन जगतो. त्याचे घर हैदराबादच्या प्राइम लोकेशनवर आहे. प्रभासचे आलिशान घर सर्व प्रकारच्या सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामध्ये लक्झरी वस्तू आहेत. रिपोर्ट्सनुसार, प्रभास २०१४ मध्ये त्याच्या आलिशान घरात शिफ्ट झाला होता. त्यांच्या या आलिशान घराची किंमत जवळपास ६५ कोटी आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

आलिशान घरात राहणारा प्रभास महागड्या वाहनांचा शौकीन आहे, त्यामुळे त्याच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक सरस वाहने आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Skoda Superb, BMW X3, Jaguar XJR, Range Rover आणि Rolls Roy Phantom यांचा समावेश आहे. त्याच्या गाड्यांची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगितले जाते. फक्त Rolls Roy बद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत ८ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

२०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली’ चित्रपटाने प्रभासचे नशीब चमकले आणि तो रातोरात स्टार झाला. या चित्रपटासाठी अभिनेत्याने ४० कोटी रुपये फी घेतली होती. आंध्र प्रदेशातील समृद्ध क्षत्रिय कुटुंबात जन्मलेल्या प्रभासचे पूर्ण नाव सूर्यनारायण व्यंकट प्रभास राजू उप्पलपती आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसणार आहे.