मद्यधुंद अवस्थेत मोटारीला धडक आणि पोलिसांशी गैर...

मद्यधुंद अवस्थेत मोटारीला धडक आणि पोलिसांशी गैरवर्तणूक केल्याने काव्या थापर गजाआड (Southern Actress Kavya Thapar Behind The Bars In Mumbai For Abusing Police)

काव्या थापर या दक्षिणेकडील तरुण अभिनेत्रीने काल मुंबईत रस्त्यावर, मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. अन्‌ पोलिसांवर चाल करून गेली. म्हणून तिला गजाआड करण्यात आले आहे.

जुहू येथील जे. डब्लू. मॅरिएट हॉटेल समोरून काव्या आपल्या मोटारीने चालली होती. तेव्हा तिने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मोटारीस धडक दिली. त्यात एकजण जखमी झाला. तिथे पोलीस दाखल झाले. तेव्हा काव्या दारूच्या नशेत असल्याचे त्यांना आढळले. तिची चौकशी पोलिसांनी सुरू करताच तिने त्यांना शिवीगाळ केली व त्यांच्या अंगावर धावून गेली. तेव्हा पोलिसांनी गैरवर्तणूक, सरकारी कामात अडथळा, मोटारीच्या धडकेने माणसाला जखमी करणे व दारूच्या नेशत मोटारगाडी चालवणे, इत्यादी गुन्हे दाखल करून पोलिसांनी काव्याला अटक केली. तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

काव्या २६ वर्षांची तरुणी असून तिने कित्येक म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातपटात काम केले आहे. तेलुगु चित्रपटांमधून तिने चित्रसृष्टीत पदार्पण केले. नंतर ‘एक मिनी कथा’ व ‘मार्केट राजा एम.बी.बी.एस’ या तामीळ चित्रपटांची ती नायिका होती. ‘तात्काळ’ या हिंदी चित्रपटात देखील तिने काम केले आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)