सोफी चौधरीने काळी बिकिनी घालून इंटरनेटचा पारा अ...

सोफी चौधरीने काळी बिकिनी घालून इंटरनेटचा पारा अधिकच चढवला : चाहत्यांनी केली तिच्या फिगरची तारीफ (Sophie Choudhary Sets Internet On Fire, With Hot Bikini Pics)

सोफी चौधरीच्या स्टाईल बाबत कुणाचेही दुमत नाही. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अन तिथे आपले हॉट व स्टायलिश फोटो टाकत असते. आत्ता सोफीने इंस्टा पेजवर अतिशय हॉट फोटो टाकले आहेत. त्यामध्ये ती समुद्रावर उभी असून ब्लॅक क्रॉप टॉपवर ब्लॅक बिकिनी तिने घातली आहे.

त्यावर तिने मजकूर लिहिला आहे की, मोअर स्ट्रेचिंग, लेस ट्रेसिंग. सोबत वेनस्डे विस्डम असा हॅशटॅग दिला आहे. अर्थात बुधवारचे शहाणपण!

सोफीचा हा बोल्ड अवतार पाहून चाहते व चित्रसृष्टीतील मान्यवरांनी चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत. एकाने तिच्या सेक्सी फिगरची तारीफ केली आहे. तर दुसरा युजर म्हणतो – तापमान अधिकच वाढवलंस ग!

या चित्रांमध्ये सोफीने आपल्या सपाट पोटाचं प्रदर्शन केलं आहे. तिनं केस बांधलेत. गॉगल लावला आहे. स्टनिंग, स्टायलिश, सेन्सेशनल ब्युटी क्वीन, असे आणखी एका चाहत्याने तिचे वर्णन केले आहे.

अनुषा दांडेकर, श्रुती हसन, आशिष चौधरी यांनी पण तिला ‘हॉट, म्हणत तिचा गौरव केला आहे.