सोनू सूदला चाहत्यांनी भेटवस्तू म्हणून दिले रक्त...

सोनू सूदला चाहत्यांनी भेटवस्तू म्हणून दिले रक्ताने काढलेले त्याचे चित्र, अभिनेत्याने दिला रक्तदान करण्याचा सल्ला (Sonu Sood’s Fan Gifts Him a Painting Made Out of Blood, Actor Says ‘Donate Blood Instead’)

कोविडच्या काळात सोनू सूदने ज्या प्रकारे लोकांना उघडपणे आणि रात्रंदिवस मदत केली, त्यामुळे तो खऱ्या आयुष्यातही लोकांसाठी हिरो बनला आहे. आजही त्याच्या घराबाहेर मदतीसाठी लोकांची गर्दी असते. विशेष म्हणजे सोनू स्वतः सर्वांना भेटतो, त्यांच्या समस्या ऐकतो आणि प्रत्येकाला शक्य ती मदत करतो. त्यामुळे त्याचे चाहते त्याला देव मानतात आणि त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. नुकताच एक चाहता त्याला भेटायला आला आणि त्याने त्याच्यासाठी अशी भेट आणली की जे पाहून सोनूही हैराण झाला.

अभिनेता सोनू सूदने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक कलाकार त्याच्यासमोर त्याची पेंटिंग सादर करताना दिसत आहे. हा कलाकार प्रतापगडच्या बारखेडा गावचा रहिवासी आहे, त्याने सोनू सूदचे रक्ताने काढलेले चित्र त्याला भेट म्हणून दिले आहे. मधु आर्ट नावाच्या या कलाकाराने मुंबईत पोहोचल्यानंतर आपली आवडती व्यक्ती सोनू सूदला ते चित्र भेट म्हणून दिली.

पण व्हिडिओत, भेटवस्तू पाहिल्यावर सोनूने असं काही म्हटले ज्यामुळे त्याने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. भेटवस्तू स्विकारत सोनू म्हणतो की, हा एक हुशार कलाकार आहे. याने माझे चित्र काढले आहे. तेव्हा तो चाहता म्हणतो की, हे चित्र रक्ताने काढले आहे. त्यावर सोनू म्हणाला की हे चित्र रक्ताने काढून तू चुकीचं केलसं. त्यावर तो चाहता म्हणतो की मी तुमच्यासाठी जीवही देऊ शकतो. मग सोनू म्हणतो की, मी तुझ्या भावना समजू शकतो. पण रक्ताने चित्र का काढायचं. यापेक्षा तू रक्तदान कर.

व्हिडिओ ट्विट करताना सोनूने कॅप्शनमध्ये लिहिले की, चित्र काढून असं रक्त वाया घालवण्यापेक्षा रक्तदान करा. सोनू सूदच्या या उत्तराने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली असून ते त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो शेवटचा पृथ्वीराज चित्रपटात दिसला होता.लवकरच तो ‘तमिलरासन’ या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘फतेह’ या बॉलिवूड चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून दिसणार आहे.