चंदिगढ होस्टेलमधील विद्यार्थिनींच्या व्हिडिओबाब...

चंदिगढ होस्टेलमधील विद्यार्थिनींच्या व्हिडिओबाबत सोनू सुदने केले आवाहन, ही आपल्या बहिणींना पाठिंबा देण्याची वेळ आहे – असे ट्विट केले (Sonu Sood Reacts In Chandigarh Girls Hostel MMS Leak Case, Writes- It’s Time For Us To Stand With Our Sisters, Be Responsible)

चंदिगढ येथील एका खासगी होस्टेल मधील काही विद्यार्थिनी आंघोळ करीत असताना घेतलेला एमएमएस जिकडे तिकडे पसरल्याने देशभरात खळबळ माजली आहे. सिमला येथील एका माणसाने हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केल्यावर ही बाब उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार विद्यापिठातीलच एका मुलीने, अंदाजे ६० मुली आंघोळ करत असतानाचे व्हिडिओ बनविले अन्‌ ते आपल्या मित्राला पाठवले. त्या शहाण्याने ते व्हिडिओज्‌ इंटरनेटवर अपलोड केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. बदनामीच्या भितीपोटी त्यापैकी ८ विद्यार्थिनी आत्महत्या करायला निघाल्या होत्या, अशी पण खबर आहे.

मात्र या घटनेबाबत देशभरातील लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यावर सोनू सुदने आपली प्रतिक्रिया देऊन म्हटले आहे की, मुलींचे हे व्हिडिओ आता आणखी प्रसारित करू नका.

सोनू सुद ट्विटमध्ये लिहितो- चंदिगढ विद्यापीठाबाबत जे घडलं, ते अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या भगिनींना पाठिंबा देऊन आपण जबाबदार असल्याचा आदर्श घालून द्यावा. निव्वळ पीडितच नव्हे तर आपल्या सर्वांच्या कसोटीचा हा क्षण आहे.

सोनूच्या या आवाहनाची, त्याचे चाहते प्रशंसा करत आहेत.

या संदर्भात विद्यापिठ परिसरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने निषेध व्यक्त केला. तर हा व्हिडिओ तयार करणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे.